करमाळा शेती - व्यापार सोलापूर जिल्हा

बागल यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्यांत दहशत, तात्काळ बंदोबस्त न केल्यास वन अधिकाऱ्यांना काळे फासू.. रासपचा इशारा!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बागल यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्यांत दहशत, तात्काळ बंदोबस्त न केल्यास वन अधिकाऱ्यांना काळे फासू.. रासपचा इशारा!

जेऊर (प्रतिनिधी); करमाळा – अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील मांगी तसेच कामुने वडगाव या परिसरात बिबट्याची अद्यापही दहशत कायम असून मांगी परिसरातील शेतकरी सध्या कमालीच्या दहशतीखाली वावरत आहे 23 ऑगस्ट बुधवारी च्या मध्यरात्री दोन वाजता बिबट्याने मांगी येथील विनोद आदिनाथ बागल यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासरा वरती हल्ला करून वासराला ठार केले आहे. हा बिबट्या दररोज शेतकऱ्यांच्या गाई वासरांवरती हल्ले करून जनावरे ठार करत आहे.

गेल्या चार ऑगस्ट पासून आज 24 ऑगस्ट उजाडला, तरी तब्बल वीस दिवस हा बिबट्या वन विभागाला चकवा देत असून हा बिबट्या दररोज पाळीव प्राण्यांवरती हल्ले करून त्यांना फस्त करत आहे. गेल्या वीस दिवसात किमान दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवरती हल्ले करून ठार केलेले आहे.

यामुळे मांगी पंचक्रोशीतील दक्षिण वडगाव, उत्तर वडगाव, पोथरे ,कामोने जातेगाव या शिवारामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असून, शेतकरी जीव मुठीत धरून शेतीची कामे करत आहेत.

तसेच शेतात काम करण्यासाठी महिला मजूर घाबरत असून, रात्री बाहेर पडायला सुद्धा लोक घाबरत आहेत. यामुळे समस्त गावकऱ्यांकडून वनविभाग कर्मचाऱ्यां वरती संताप व्यक्त केला जात आहे.

वारंवार पिंजरे लावूनही बिबट्या वनविभागाच्या हाती लागत नसून, तो दररोज आपली जागा बदलत असून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाळीव जनावरांवरती हल्ले करत आहे.

तरी सदरील बिबट्याला लवकरात-लवकर जेर बंद करा ही ग्रामस्थांकडून वारंवार मागणी होत आहे.

गेली एक महिन्यापासून आम्ही ग्रामस्थ बिबट्याच्या प्रचंड दहशतीमुळे रात्री शेताकडे फिरकत नाही आमची उभी पिके अक्षरशः जळत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी कमालीचा घाबरला आहे तेव्हा शासनाने ड्रोन च्या माध्यमातून बिबट्याचा तपास करावा अन्यथा पिंजऱ्याची संख्या वाढवावी

– नवनाथ बागल
सरपंच, मांगी तालुका करमाळा

हेही वाचा – फिसरे येथे पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांचे हाल; शिवसाम्राज्य युवा प्रतिष्ठान तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जारची सोय

खासदार निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे जेऊर, माढा, केम येथे रेल्वे गाड्यांना थांबा; गणेश चिवटे

मांगी,पूनवर,पोथरे, कामोणे परिसरात गेली महिनाभरापासून बिबट्याचा वावर असल्याने या भागातील शेतकरी, नागरिकांना रात्री-अपरात्री शेती कामासाठी बाहेर पडावे लागते. त्यामुळे या भागात बिबट्याची प्रचंड भीती आहे.

त्यामुळे महावितरण विभागाने याबाबतची तत्परता दाखवत या भागाला दिवसा विज सोडावी. तसेच वनविभागाने त्या भागात आजून पिंजरे व कॅमेरे वाढवून बिबट्यास तात्काळ जेरबंद करावे.त्या बिबट्याने वासरू, कुत्र्याला फस्त करून खाल्ले आसून देखील वनविभागाने तत्पता दाखवलेली नाही. एखाद्या माणसांचा बळी जाण्याची वाट वनविभाग पहाता आहे.काय? तसेच झाले तर त्या संबंधित अधिकाऱ्यांला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने काळे फासू.

– अंगद देवकते जिल्हा सरचिटणीस रासप

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!