करमाळासोलापूर जिल्हा

झरे सोसायटीवर जगताप गटाचे वर्चस्व

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

झरे सोसायटीवर जगताप गटाचे वर्चस्व

(प्रतिनिधी); झरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळविला आहे .जगताप गटाचे खंदे समर्थक नारायण शेठ आमृळे यांच्या नेतृत्वा खालील ज्योर्तिलिंग जनसेवा शेतकरी विकास पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले . भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी म्हणून महादेव काळे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले होते .

अन्य विजयी उमेदवारामधे अकबर मुलाणी,दत्तू चौधरी , अर्जुन गायकवाड , अशोक गुंजाळ , महादेव घाडगे , कल्याण कोठावळे , पांडुरंग मावलकर , राजेंद्र मावलकर ( सर्वसाधारण कर्जदार खातेदार मतदारसंघ ) अशोक सरोदे ( अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मतदारसंघ ) भानुदास बोराटे ( इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी) लक्ष्मीबाई आमृळे , कमल कांबळे ( महिला प्रतिनिधी )यांचा समावेश आहे .

हेही वाचा – राहुल गांधी यांना सुनविलेल्या शिक्षेच्या निषेधार्ध करमाळयात काँग्रेसचे जेल भरो आंदोलन; अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक

नवरीचे दागिने घेऊन चोर पसार: करमाळा येथील मंगल कार्यालयातील घटना, पोलीसात गुन्हा दाखल

सर्व विजयी उमेदवारांचे आमदार संजयमामा शिंदे ,माजी आमदार जयवंतराव जगताप , नगराध्यक्ष वैभव जगताप,तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभुराजे जगताप यांनी अभिनंदन केले आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ .एस . के . मुंढे यांनी काम पाहीले . मतदान व मतमोजणी वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

litsbros

Comment here