करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

नवरीचे दागिने घेऊन चोर पसार: करमाळा येथील मंगल कार्यालयातील घटना, पोलीसात गुन्हा दाखल 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

नवरीचे दागिने घेऊन चोर पसार: करमाळा येथील मंगल कार्यालयातील घटना, पोलीसात गुन्हा दाखल

करमाळा(प्रतिनिधी) : नववधूला लग्नादिवशीच लग्नात घालण्यासाठी आणलेल्या तीन तोळ्याचे सोन्याची आभूषणे नजर राखून अज्ञाताने चोरल्याने लग्नघरात एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान या चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी दोन-तीन दिवस टाळाटाळ केल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत वधू वरच्या नातेवाईकामधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सदरची घटना १८ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान नालबंद मंगल कार्यालय करमाळा येथे घडली आहे.

याप्रकरणी करमाळा येथील गणेश दत्तात्रय गवळी रा. खडकपुरा ता. करमाळा यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

याबाबतची हकीकत अशी की, करमाळा येथील रहिवासी गणेश गवळी यांचे साडू रामचंद्र हारमोडे रा. कळंम ता. इंदापूर जिल्हा पुणे यांचा मुलगा विशाल हारमुडे यांचा विवाह करमाळा येथील राजेंद्र घोरपडे यांची मुली सोबत १८ मार्च रोजी नालबंद मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या विवाहात हारमोडे यांनी नववधुस लग्नात घालण्यासाठी दागिने बनवले होते. 

त्यामध्ये कर्णफुले व मिनी गंठण व मोठे गंठण असे दागिने त्यांचा साडू गणेश गवळी यांच्या आई कडे ठेवले होते. त्यातील १७ मार्च रोजी सायंकाळी हळदी समारंभादिवशी कर्णफुले नववधुला घालण्यासाठी दिले होते .

तर दुसऱ्या दिवशी १८ मार्चला २३.३९० ग्रॅम वजनाची सोन्याचे गंठण व १०.३३० ग्रॅम वजनाचे मिनी गंठण असे एकूण एक लाख ३५ हजार रुपयांचे दागिने हे लग्नादिवशी नववधूला देण्यासाठी आणले होते. एका पिशवीत दागिने घेऊन गवळी कुटुंबीय हे लग्नादिवशी नालबंद मंगल कार्यालयात आले .

नवरदेव परण्यासाठी गेल्यामुळे गणेश गवळी यांच्यासह इतर कुटुंबीय हेही त्यांच्याबरोबर गेले होते. नवरा मुलगा परण्यासाठी गेलाय तोपर्यंत मुलीला ते दागिने देण्यासाठी गवळी यांच्या आईने पिशवीची तपासणी केली असता सदर पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान एक अनोळखी महिला त्या परिसरात पाहुण्यांसारखी फिरत असल्याचेही काहीच्या लक्षात आले .

शिवाय मंगल कार्यालय पासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही मध्येही एक महिला घाई गडबडीत निघून जात असतानाही निदर्शनास आली आहे. यावरून त्या महिलेचा शोध घेण्याचेही काम सुरू आहे. 

दरम्यान नवऱ्याकडील मंडळींनी नवरी मुलीला देण्यासाठी आणलेल्या दागिन्यांवर अज्ञाताने हात साफ केल्याने आनंदाच्या विवाह सोहळ्यावर पाणी पडले.दरम्यान घरातील जबाबदार मंडळीनी तात्काळ यावर तोडगा काढून नववधूच्या दागिन्याची सोय करून विवाह सुलभ केला.

मात्र करमाळा पोलीस ठाण्यात नववधूच्या दागिन्याची चोरी केल्याप्रकरणी दि २२ रोजी करमाळा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एम. एन. जगदाळे हे करीत आहेत.

litsbros

Comment here