यशकल्याणी सेवाभावी संस्थेकडून पोथरे जिल्हा परिषद केंद्र शाळेस 2 स्मार्ट टी.व्ही प्रदान
पोथरे(प्रतिनिधी); यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा मार्फत पोथरे येथे दि. 18 जानेवारी पासून राष्ट्रीय सेवा योजना शिबिर राबविण्यात येत आहे. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेतर्फे संस्थेचे सर्वेसर्वा गणेश करे पाटील यांनी पोथरे शाळेची सर्वच क्षेत्रात शैक्षणिक घोडदौड पाहता जाहिर केल्याप्रमाणे तहसिलदार शिल्पाताई ठोकडे मॅडम, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, प्रा. फंड सर, प्राचार्य पाटील सर, पोथरे गावचे सरपंच अंकुश शिंदे साहेब, सूरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर यांच्या उपस्थितीत शाळेला 2 स्मार्ट टी .व्ही प्रदान करून शाळेचे विशेष कौतुक करत भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गजेंद्र गुरव सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष साळुंके, शिक्षण तज्ञ झिंजाडे सर, उपशिक्षक बापू रोकडे सर , शाबिरा मिर्झा मॅडम , स्वाती गानबोटे मॅडम , सविता शिरसकर मॅडम उपस्थित होते .
स्मार्ट टी.व्ही देऊन शाळेच्या विकासाला हातभार लावल्याबद्दल श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी मॅडम यांनी गणेशभाऊ करे पाटील यांचे विशेष आभार मानून यापुढे ही संस्थेकडून शाळेच्या विकासासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
Comment here