करमाळामनोरंजनमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

शेतकरी राजाची गोष्ट मोठ्या पडद्यावर झळकणार, टिझरला उदंड प्रतिसाद; ‘नवरदेव (Bsc Agri)’ चित्रपट २६ जानेवारीला होणार प्रदर्शित

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

शेतकरी राजाची गोष्ट मोठ्या पडद्यावर झळकणार, टिझरला उदंड प्रतिसाद; ‘नवरदेव (Bsc Agri)’ चित्रपट २६ जानेवारीला होणार प्रदर्शित

केत्तूर (अभय माने) ‘शेतकरी राजा आणि या राजाला न मिळणारी नवरी’ या गंभीर प्रश्नावर प्रभावी भाष्य करणारा ‘नवरदेव (Bsc Agri.)’ हा चित्रपट 26 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय. तमाम तरूणाईच्या अगदी मनाजवळचा विषय म्हणजे लग्न! सध्या सगळीकडे भरपूर शेतकरी लग्नाळू नवरदेव दिसतात मात्र त्यांना भुरळ घालण्यासाठी नवरीचा वणवण शोध घ्यावा लागतो.

हाच विषय मोठया पडद्यावर घेऊन येत आहेत दिग्दर्शक राम खाटमोडे! नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला. अभिनेता क्षितीश दाते नवरदेवाच्या भूमिकेत झळकणार आहे, तर प्रियदर्शिनी इंदलकर, नवरी म्हणून त्याला मिळणार की नाही, हे चित्रपटगृहात जाऊनच बघावे लागेल.

आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय. दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने या विषयावर भाष्य करत हा विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे.

शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव BSc. Agri.’ या चित्रपटाचं टिजर रिलीज झालं आणि प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेलं या चित्रपटातील ‘भेटणार कधी नवरदेवा नवरी’ हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र याच गाण्याची धून ऐकू येत आहे.

हेही वाचा – स्वातंत्र्यानंतर प्रथमच म्हसेवाडी गावासाठी सुरू झाली बससेवा;गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती मागणी

‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक खा. शरद पवार यांच्या हाती; लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली शरद पवार यांची भेट

शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे. क्षितीश दाते या चित्रपटात तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसेल,

त्यासोबतच प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळेल. एका गंभीर सामाजिक प्रश्नाला हलक्या-फुलक्या पद्धतीत प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे काम या चित्रपटाची टीम करत आहे.

आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक विनोद वणवे हे आहेत, तर विनोद सातव हे क्रिएटीव्ह हेड आहेत. हा चित्रपट 26 जानेवारीला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

चित्रपटाचे दिग्दर्शक राम खाटमोडे दिवेगव्हाण (ता.करमाळा )येथील रहिवासी असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय खाटमोडे यांचे चिरंजीव आहेत.या चित्रपटाचे मीडिया पार्टनर म्हणून ॲग्रोवन हे दैनिक असून 26 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

litsbros

Comment here