वाशिंबे येथे गणेशोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर संपन्न
केतूर (अभय माने) नवयुग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ वाशिंबे यांच्या वतीने गणेशोत्सव निमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने सोमवार (ता.25 ) रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या आयोजित रक्तदान शिबिरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास पाण्याचा जार व हेल्मेट भेट देण्यात आले.
गणेशोत्सव निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करुन एक वेगळा आदर्श निर्माण केल्याबद्दल वाशिंबे परिसरातून नवयुग तरुण मंडळाचे सर्व स्तरातून कौतूक केले जात आहे.
हेही वाचा – लहान मुलीची खरेदी करून तिच्याकडून भीक मागून घेणाऱ्या व्यक्तीना अटक; लहान मुलीची मुक्तता
छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते रेश्मा दास यांच्या ‘सुमी” पुस्तकाचे प्रकाशन
यापूर्वी मागील वर्षी मंडळाच्या वतीने वाशिंबे गावातील 1500 जनावरांना मोफत लंपी संसर्गजन्य रोगावर लसीकरण करण्यात आले होते.रक्तदान शिबीर कमलाभवानी रक्तपेढी करमाळा यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या रक्तसंकलन केले.
Comment here