क्राइमपुणे

लहान मुलीची खरेदी करून तिच्याकडून भीक मागून घेणाऱ्या व्यक्तीना अटक; लहान मुलीची मुक्तता

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लहान मुलीची खरेदी करून तिच्याकडून भीक मागून घेणाऱ्या व्यक्तीना अटक; लहान मुलीची मुक्तता

पुणे(प्रतिनिधी); लहान मुलींची खरेदी करून तिच्याकडून भीक मागून घेणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन लहान मुलींची मुक्तता पुणे शहर पोलीस सामाजिक सुरक्षा विभाग व येरवडा पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाईत केली.

ॲड शुभम लोखंडे यांना एक चार वर्षाची मुलगी एका महिलेबरोबर भीक मागत असताना दिसली अधिक चौकशी केली सदर मुलीला दोन हजार रुपयात खरेदी केली असून तिला साज घालून भीक मागण्याची परवानगी जातपंचायतीने दिली असल्याची माहिती दलित कोब्राचे भाई विबेक चव्हाण यांना मिळाली.

त्यांनी पुणे शहर सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांची भेट घेऊन माहिती दिली मा सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेबांनी तातडीने कारवाईचे दिले त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभाग व येरवडा पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करून या लहान मुलींची मुक्तता करून संबंधित पंधरा लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पुणे शहरात भिकाऱ्यांच्या टोळ्या भीक मागण्यासाठी लहान मुले विकत किंवा भाड्याने घेतली जातात अशी चर्चा गेल्या काही दिवसात पुणेकर जनतेत चर्चा होती.

भारतीय दलित कोब्रा तर्फे पुणे पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालया समोर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त मा सतीश गोवेकर साहेब यांच्या उपस्थितीत सामाजिक सुरक्षा विभागाचे मा पोलीस निरीक्षक भरत जाधव साहेब पोलीस सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे सहाय्यक निरीक्षक माळवदे साहेब येरवडा पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक कदम ,

माननीय गुन्हे पोलीस निरीक्षक अश्विनी जाधव साहेब माननीय पोलीस सहाय्यक निरीक्षक डोंबाळे साहेब तपास अधिकारी मा पोलीस उपनिरीक्षक नांगरे साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते

litsbros

Comment here