करमाळासोलापूर जिल्हा

वाशिंबे येथील भूयारी मार्ग कामाचा सेतूबंधन योजनेत समावेश करण्याची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वाशिंबे येथील भूयारी मार्ग कामाचा सेतूबंधन योजनेत समावेश करण्याची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

जेऊर(प्रतिनिधी); वाशिंबे ता. करमाळा येथील भूयारी मार्ग रस्ते काम केंद्र सरकारच्या सेतूबंधन योजनेत समावेश करुन सदर भूयारी मार्गाचे काम करण्याचे आश्वासन नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री भारत सरकार यांनी दिल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

वाशिंबे येथील वाशिंबे ते राजूरी व वाशिंबे ते पारेवाडी या मार्गावर भूयारी मार्ग व्हावा यासाठी मकाई सहकारी साखर कारखाना संचालक गणेश झोळ,उपसरपंच अमोल पवार,पत्रकार सुयोग झोळ,रणजीत शिंदे,सतिष झोळ यांनी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.

या मागणीची सकारात्मक दखल घेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन सदर भूयारी मार्ग कामाचा केंद्र सरकारच्या सेतूबंधन योजनेत समावेश करुन या मार्गासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली.

हेही वाचा – आई, वडील रोजंदारीवर कामाला, मुलीने पटकाविले ९६ टक्के गुण; अँड्रॉइड मोबाईल देउन सन्मान

कुकडीच्या पाण्याचे ग्रामस्थांकडून विविध ठिकाणी पूजन; आ.संजयमामा शिंदे यांचे आभार मानणारे गावोगावी लागले फ्लेक्स

यावेळी नितीन गडकरी यांनी या भूयारी मार्गाचा सेतूबंधन योजनेत समावेश करुन निधीची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

litsbros

Comment here