करमाळासोलापूर जिल्हा

कुकडीच्या पाण्याचे ग्रामस्थांकडून विविध ठिकाणी पूजन; आ.संजयमामा शिंदे यांचे आभार मानणारे गावोगावी लागले फ्लेक्स

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कुकडीच्या पाण्याचे ग्रामस्थांकडून विविध ठिकाणी पूजन; आ. संजयमामा शिंदे यांचे आभार माननारे गावोगावी लागले फ्लेक्स

करमाळा(प्रतिनिधी);
जवळपास 25 वर्षांपूर्वी कुकडी प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यात आले .परंतु पोंधवडी चारी चे काम अपूर्ण असल्यामुळे तालुक्यातील अनेक गावे कुकडीच्या पाण्यापासून वंचित होती . कुकडी प्रकल्प डावा कालवा अंतर्गत पोंधवडी चारीचे काम निधीअभावी 2009 पासून रखडलेले होते.

सदर चारीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून विहाळ, कोर्टी ,गोरेवाडी ,हुलगेवाडी ,कुस्करवाडी राजुरी, वीट, अंजनडोह या गावातील नागरिक सातत्याने लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत होते.कॅनॉलचे कामे रखडल्यामुळे कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये कुकडीचे पाणी दाखल झालेले नव्हते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी प्रकल्प अंतर्गत येणारी पोंधवडी या चारीचे काम पूर्ण करून या चारीवरील गावांना आपण पाणी देऊ असे वचन दिले होते. या वचनाची पूर्ती 2023 मध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडून झाली .

पोंधवडी चारीसाठी 9 कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त झाल्यामुळे या चारीवरील सर्व कामे पूर्ण होऊन प्रत्यक्षात 2 ऑगस्ट 2023 पासून ओव्हर फ्लो चे पाणी पोंधवडी चारीवरून सुरू झाले आहे.

कुस्करवाडी चारीवरआखाडे वस्ती नजीक महिलांनी आज कुकडीच्या पाण्याचे पूजन केले. याप्रसंगी संगीता आखाडे,शालन आखाडे, तनुजा शिवाजी पाटील, सविता आखाडे,काशिनाथ आखाडे, कल्याणी आखाडे, शिवाजी पाटील,शकर राऊत, नवनाथ आखाडे,राजू आखाडे,रेवन्नाथ आगलावे, भाऊसाहेब आखाडे, रविंद्र आखाडे,सोनू आखाडे आदिनाथ आखाडे,सागर आखाडे आदी उपस्थित होते.

 

त्रिंबक पाटील वस्तीवरीलशेतकऱ्यांनीही पाणी पूजन केले. याप्रसंगी मधूकर गावडे,संभू गावडे, दादा गावडे, मोहन शिरसकर,विजू गावडे,सलीम शेख, शंकर राऊत, शिवाजी पाटील,राजू आखाडे,रवि आखाडे,सोनू आखाडे,शाहरुख पठाण उपस्थित होते.

हवालदार वाडी नजीक स्वाती हगारे ,सारिका हगारे ,लक्ष्मी हगारे ,प्रगती हगारे ,अंजना माळवे या महिलांनी पाणी पूजन केले .याप्रसंगी कोर्टीचे माजी उपसरपंच सुभाष अभंग ,शिवाजी गावडे,माजी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब गावडे,विकास गावडे, जिजाबा हगारे , आकाश जाधव , शशिकांत गावडे ,धनाजी गावडे, उमेश हगारे, संदीप हगारे ,रावसाहेब हगारे ,छगन माळवे, संजय जाधव, बाबासाहेब चव्हाण, संजय गावडे, दिगंबर हगारे ,आदित्य हगारे ,संदीप गावडे, जनार्दन गावडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने रावगांव येथे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न

विहिरीचे बांधकाम चालू असताना अचानक कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले चार कामगार

दिवटेवाडी येथे महिलांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले तर शेतकरी बंधूंनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

यावेळी निलकंठ तात्या अभंग, मारूती घोगरे, नागेश जाधव, संतोष झाकणे, गोरख शेलार, तुकाराम साबळे, बापू बोराडे, काका डबडे, लाला गाढवे, काका डबडे, बाबुराव जाधव, महेश शितोळे उपस्थित होते.

litsbros

Comment here