करमाळाकेमशैक्षणिक

श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम याठिकाणी भित्तीपत्रिका उदघाटन करून मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम याठिकाणी भित्तीपत्रिका उदघाटन करून मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

केम- श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी मराठी साहित्यातील अजरामर कवी व सुप्रसिद्ध साहित्यिक poo कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते नवनाथ लोंढे, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथआप्पा तळेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  वसंत तळेकर, प्राचार्य सुभाष कदम हे उपस्थित होते.


या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर या ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मराठी राजभाषा दिन या भित्तीपत्रिकाचे उद्घाटन नवनाथ लोंढे व सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवनाथ लोंढे यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून या कॉलेजच्या नवोपक्रमाचे कौतुक केले. दशरथआप्पा तळेकर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – वीट येथे रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी रस्ता रोको आंदोलन आचार संहिता पूर्वी योजना मार्गी लागली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार -शेतकऱ्यांचा एल्गार

पालकमंत्री चंद्रकांतदादा व खा. निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी ‘इतका’ निधी मंजूर – गणेश चिवटे

शालेय समिती अध्यक्ष वसंत तळेकर यांनी मराठी भाषा दिन आणि मराठीचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष कदम यांनी मराठी भाषाचे वेगळेपण सांगितले.
या कार्यक्रमास प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ.संतोष साळुंखे, प्रा . एस.के.पाटील, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे आणि इयत्ता अकरावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

litsbros