करमाळाशेती - व्यापार

उजनीची अर्धशतकाकडे वाटचाल सुरू; आजचा पाणीसाठा..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनीची अर्धशतकाकडे वाटचाल सुरू; आजचा पाणीसाठा..

केत्तूर (अभय माने) : करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्रातील परिसरात परतीच्या पावसाने सलग पाचव्या दिवशी हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकात आनंदाचे वातावरण आहे.

       गणेशोत्सव सुरू होताच पाऊस पडेल अशी अपेक्षा होती परंतु, पहिले तीन-चार दिवस कोरडे टाक गेल्यानंतर शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते परंतु त्यानंतर मात्र पावसाने हजेरी लावली असून दिवसभरात एकदा तरी दमदार तसेच रिमझिम का होईना पाऊस हजेरी लावत आहे.

 पावसाळ्यातच पाऊस नसल्याने ऊस तसेच फळबागांची वाढ खुंटली होती तसेच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होऊ लागला होता आता मात्र रोज पाऊस होत असला तरी ओढे, नाला बिल्डिंग अद्यापही न वाहिल्याने तालुक्यातील पाझर तलाव अजूनही तळातच आहेत.

    पुणे जिल्हा व परिसर तसेच घाटमाथ्यावर होत असलेल्या पावसाच्या बळावरच खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, आणि खडकवासला ही तीन धरणे 100 टक्के भरल्याने मुळा नदीत पाणी सोडले जात आहे.

 त्यामुळे उजनी धरणाचा पाणीसाठा वाढत असून सध्या उजनी धरणाचा पाणीसाठा 42 टक्के वर जाऊन पोहोचला आहे ही समाधानाची बाब म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. उजनी धरण 50 टक्केही भरणार नाही अशीच चर्चा होत होती परंतु सध्या उजनी धरणांने सध्या 50 % कडे वाटचाल सुरू केली असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसह नागरिकांचे चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे.

उजनी जलाशयाने पन्नास टक्केकडे वाटचाल सुरू केल्याने आगामी पाणी प्रश्नही मिटला आहे तसेच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न काहीअंशी मिटला आहे.सध्या उजनी जलाशयाला परतीच्या पावसाने दिलासा देण्याचे काम केले असून उजनी धरणाची वाटचाल अर्धशतकाकडे सुरू झाली आहे. 

उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांची पाण्याजवळील विद्युत मोटार,केबल, पाईप काढण्याची गडबड सुरू झाली आहे.

litsbros

Comment here