करमाळासोलापूर जिल्हा

उजनी लाभक्षेत्रातून हुरडा पार्टी झाली दुर्मिळ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

*उजनी लाभक्षेत्रातून हुरडा पार्टी झाली दुर्मिळ*

केत्तूर ( अभय माने ) करमाळा तालुक्याच्या जिरायती भागातील ज्वारी काढण्याचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्र परिसरात बागायती शेतीचे क्षेत्र वाढत असल्याने रब्बी हंगामातील ज्वारी पिक जवळजवळ नामशेष झाले आहे या बागायती भागातील शेतकरी ऊस तसेच केळीसह पेरू, पपई, डाळींब आदी पिकांना पसंती देत आहेत परिणामी या भागातील ज्वारीचे क्षेत्र संपुष्टात आल्याने यावर्षी हुरडा पार्ट्या दुर्मिळ झालेल्या आहेंत.


पूर्वी ज्वारी काढणीच्या अगोदर कुटुंबातील बच्चेकंपनी, महिला, पुरुष शेतात जाऊन हुरडयाची कणसे काढून त्याला भाजण्यासाठी आगटी करून त्यावर गोवऱ्या ठेवून ज्वारीची कणसे भाजली जात व त्यापासून हाताने मळून हुरडा तयार केला जात असे. या गोष्टीचा आनंद काही वेगळाच होता हुरड्या बरोबर शेंगदाण्याची चटणी, फरसाण, कोवळा लुसलुशीत हरभरा,मक्याची कणसे आता हा आनंद आता बोलण्यापुरताच राहिला आहे. हुरडा पार्टीसाठी मित्रपरिवार तसेचच पाहुणे मंडळींना आवर्जून बोलवले जात होते परंतु आता हुरडा पार्टीच होत नसल्यामुळे हमखास पाहायला मिळणारी पाहुणे रावळ्यांची वर्दळही थांबली आहे. हुरडा पार्टीमुळे ग्रामीण भागात एक वेगळाच आनंद मिळत होता तो वरचेवर दुर्मिळ होत आहे हेच खरे !!!

हेही वाचा – करमाळा कुटीर रुग्णालयाचे नाव बदलून ‘हे’ नाव देण्याची मागणी; तहसीलदार यांना निवेदन

परदेशी दांपत्याकडून श्रीराम प्रतिष्ठानचे आभार ,प्रतिष्ठानच्या वतीने परदेशी दांपत्याचा लग्नाचा वाढदिवस साजरा

” करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात उजनी जलाशयामुळे बागायती क्षेत्रात वरची वर वाढ होत असल्याने परिसरातील ज्वारीचे क्षेत्र संपले आहे.पर्यायाने येथील शेतकऱ्यांना हुरडा खाण्यासाठी भागात जावे लागत आहे.परिसरात ज्वारी लावली तरी ज्वारीमध्ये दाना भरताच उजनी जलाशयावर दाखल झालेले विविध पक्षी त्याचा फडशा पाडतात.
– शहाजी पाटील,शेतकरी, केत्तूर (ता.करमाळा)

litsbros