करमाळासोलापूर जिल्हा

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या बँकांना धडा कोण शिकवणार ? ज्येष्ठ पत्रकार येवले यांचा सवाल !

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या बँकांना धडा कोण शिकवणार ? ज्येष्ठ पत्रकार येवले यांचा सवाल !

जेऊर(प्रतिनिधी) –
केंद्र व राज्य शासनाच्या तसेच रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार देशातील व राज्यातील सुशिक्षित-बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने अनेक विनातारण तसेच अनुदानित,व्याज परतावा मिळणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्याचं, कर्जपुरवठा करण्याचं मुख्य कर्तव्य हे राष्ट्रीयीकृत बँकांचे आहे.पण प्रत्यक्षात मात्र या बँका या योजना राबविण्याबाबत अतिशय उदासीन असल्याचे कटू वास्तव असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या या बँकांना व संबंधित बँक अधिकाऱ्यांना धडा कोण शिकवणार ? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार,सामाजिक व राजकीय कार्यकर्ते विवेक येवले यांनी केला आहे.

याविषयी पुढे बोलताना येवले म्हणाले की,या योजनांचा लाभ गरजूंना मिळण्यासाठी,सबसिडी-अनुदान मिळण्यासाठी शासनाने जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग,विविध महामंडळे यांची स्थापना केलेली आहे.या माध्यमातून PMEGP,CMEGP या योजनेअंतर्गत गरजू बेरोजगारांना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे विनातारण द्यावे असे रिझर्व्ह बँकेचे स्पष्ट निर्देश आहेत.तसेच १० लाखांपासून ते २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जमर्यादेपर्यंत या प्रकरणांना CGTMSE हे केंद्र शासनाचे ट्रस्ट अथवा संस्था ही को-लॅटरल गॅरंटी देते ही बाब सर्व बँकांना तसेच बँक अधिकाऱ्यांना ठाऊक असतेच.

असे असताना या बँका व बँक अधिकारी हे या योजनांचा लाभ गरजूंऐवजी बँकांच्या दृष्टीने सोयीस्कर अशा उद्योजक,व्यापारी,नेते मंडळी आदींच्या पदरात कसा पडेल हेच धोरण अवलंबत असतात. बँकांच्या या धोरणामुळेच विजय माल्ल्या,नीरज मोदी आदी अनेक प्रकरणे आजवर घडलेली आहेत.हाच प्रकार गरजू शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्याच्या बाबतीत घडतो,त्यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत या योजनांचे लाभ पोहोचूच शकत नाहीत.

त्यामुळे शेतकरीवर्ग हा दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या गांजत, कर्जबाजारी होत चाललेला असून दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच चाललेल्या आहेत.हे सगळं कुठंतरी थांबण्यासाठी व थांबविण्यासाठी बँका,प्रशासन व एकूणच व्यवस्थेला ताळ्यावर आणण्यासाठी संघटीत होऊन प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.

हेही वाचा – खासदार निंबाळकर यांचा करमाळा दौरा उजनी दुर्घटनेतील कुटुंबीय व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट

उमरड येथील अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदित्य पाटील तर उपाध्यक्षपदी गणेश मारकड यांची निवड

त्यासाठी गरजू सुशिक्षित बेरोजगार, कर्ज न मिळणारे छोटे व्यावसायिक, योजनांपासून वंचित ठेवले जाणारे शेतकरी या सगळ्या वर्गाने एकत्र येऊन एकूणच सिस्टिमपुढे आव्हान उभे करणे गरजेचे आहे.

तूर्त या अभियान व आंदोलनाची सुरुवात करमाळा तालुक्यापासून करण्याचे प्राथमिक नियोजन असून हे आंदोलन उभे करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिक, युवक व शेतकऱ्यांनी बँका,प्रशासन यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे नडलेल्या, गांजलेल्या सर्वांनी आपणाशी समक्ष अथवा ९४२३५२८८३४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन येवले यांनी केले आहे.

litsbros