करमाळाकुर्डुवाडीसोलापूर जिल्हा

करमाळा नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी ओढे, नाले साफसफाई करावी; माजी नगरसेविका बानू फारुक जमादार यांची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी ओढे, नाले साफसफाई करावी; माजी नगरसेविका बानू फारुक जमादार यांची मागणी

करमाळा (प्रतिनिधी)
करमाळा नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले ओढे यांची साफसफाई करावी अशी मागणी करमाळा नगर परिषदेचे माजी नगरसेविका बानू फारूक जमादार यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी करमाळा यांच्याकडे केली आहे.

जमादार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दरवर्षी शहरात मान्सूनपूर्व ओढे नाले याची स्वच्छता करण्यात येते परंतु आत्ता पर्यंत नगरपालिकेने ओढे नाले साफ सफाई करण्यास सुरुवात केलेली नाही सध्या अवकाळी पाऊस पडत असून शहरातील नाले ओढ्यामध्ये अत्यंत घाण झालेली असून काही ठिकाणी वेड्या बाबळी ची झाडे मोठी झालेली दिसून येत आहे.

तसेच व
ओढ्यातही प्रचंड प्रमाणात घाण झालेली दिसून येत आहे परंतु नगरपालिकेला अद्याप पर्यंत नालेसफाई बाबत कोणतीही काळजी नसल्याचे दिसून येत आहे सन 2008 पासून करमाळा शहरातील ओढ्या नाल्यात पावसामुळे अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत.

त्यामुळे नगरपालिकेने याबाबत सतर्क राहून त्वरित करमाळा शहरातील ओढे नालेची त्वरित साफसफाई करावी तसेच करमाळा नगरपालिकेने आपत्कालीन विभाग कार्यान्वित करावा व त्या ठिकाणी जबाबदार कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी व शहरातील नागरिकांना आपत्कालीन विभागाशी संपर्क साधण्यासाठी करमाळा नगरपालिकेचा लँडलाईन त्वरित चालू करण्यात यावा व नागरिकांसाठी फोन नंबर उपलब्ध करून देण्यात यावा.

हेही वाचा – उमरड येथील अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदित्य पाटील तर उपाध्यक्षपदी गणेश मारकड यांची निवड

श्री उत्तरेश्वर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे एस.एस.सी परीक्षेत उत्तुंग यश सेमी इंग्रजी माध्यमाचा शंभर टक्के निकाल

तसेच मान्सूनपूर्व काळामध्ये कोणतीही जीवित हानी किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून याची दक्षता घेण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनाच्या प्रती माननीय जिल्हाधिकारी सोलापूर आमदार करमाळा विधानसभा यांना देण्यात आले आहे.

litsbros