क्राइम

‘ या ‘ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या; पोलीस दलात खळबळ 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘ या ‘ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या; पोलीस दलात खळबळ 

तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी डीआयजी विजय कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या सर्व्हिस पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. आयपीएस अधिकारी विजय कुमार यांनी स्वत:वर गोळी का झाडली? हे अद्याप समजू शकलेलं नाही. 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विजयकुमार यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे.

विजयकुमार यांनी कांचीपुरम, कुड्डालोर, नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं होतं. याच वर्षी, विजयकुमार यांनी कोईम्बतूर रेंजचे नवीन पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून पदभार स्वीकारला. याआधी त्यांची शेवटची पोस्टिंग चेन्नई येथे होती, जिथे त्यांनी पोलीस उपायुक्त म्हणून काम केलं.

आता ज्या कोइम्बतूर रेंजमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामध्ये कोईम्बतूर ग्रामीण, तिरुपूर ग्रामीण, निलगिरी आणि इरोड जिल्ह्यांचा समावेश आहे.

विजयकुमार सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले आणि 6.45 च्या सुमारास त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये आले. त्यांनी त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याला (पीएसओ) आपलं पिस्तूल देण्यास सांगितलं. हे पिस्तून घेऊन ते कार्यालयातून बाहेर पडले. सकाळी 6.50 च्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, काही आठवड्यांपासून ते नीट झोपू शकले नाहीत. ते प्रचंड नैराश्यात होते. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!