क्राइम

दुदैवी! अवघ्या ३२ वर्षीय शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुदैवी! अवघ्या ३२ वर्षीय शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

सततची नापिकी, आईचे आजारपण, वडिलांवर असणारे बँकेचे कर्ज यामुळे नैराश्यात गेलेल्या एका ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना बीड जिल्ह्यातील ममदापूर पाटोदा गावात घडली. सुधीर छत्रगुण जाधव असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

ममदापूर गावातील सुधीर जाधव यांना ५ एकर शेती आहे. त्याच शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाची मदार आहे. यातच वयोवृद्ध आईचे आजारपण आणि वडिलांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून घेतलेले दीड लाखाचे कर्ज, यामुळे सुधीर यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला होता.

त्यातचअतिवृष्टी आणि ऐन रब्बी हंगामात हातात आलेला घास काढत असताना, झालेली गारपीट यामुळे जाधव यांच्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान झालं. या नैराश्येतून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. मंगळवारी (१८ एप्रिल) त्यांनी विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. 

दरम्यान याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. सुधीर यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी एक लहान चिमुकली असा परिवार आहे. घरातील कर्ता-धर्ता व्यक्ती अचानक निघून गेल्याने जाधव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

litsbros

Comment here