करमाळाकेमसंपादकीयसोलापूर जिल्हा

श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये एस.एस.सी बॅच सन १९९३-९४ माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री उत्तरेश्वर हायस्कूल मध्ये एस.एस.सी बॅच सन १९९३-९४ माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

माढा प्रतिनिधी
श्री उत्तरेश्वर विद्यालय केम येथे वार :- रविवार दि.10 मार्च 2024 रोजी सन १९९३-९४ चा एस.एस.सी बॅच माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या गुरुजनांचे औक्षण करून पुष्प वृष्टी करुन स्वागत करण्यात आले शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार अर्पण आणि श्री उत्तरेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पूजन तसेच पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

माजी शिक्षक श्री क्षिरसागर सर, वाडेकर सर,भोंग सर,कारंडे सर,कानगुडे सर, कांबळे सर,तळेकर सर,सुरवसे सर,दोंड सर ,कोरे सर,भुसे सर,माजी वरीष्ठ लिपीक देविदास क्षिरसागर यांचा शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सन्मानित केले तसेच शाळा व्यवस्थापन समिती‌चे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर उपाध्यक्ष गणेश तळेकर, उपाध्यक्ष सचिन रणशृंगारे शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम एस.बी‌ सर यांचा सत्कारसमारंभ यावेळी करण्यात आला.

प्रशालेतील श्री कुंभार सर, श्री पाटील सर,श्री जाधव सर,गावकरे सर,प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे सर, रणदिवे सर यांची उपस्थिती होती.
पाहुण्यांचे स्वागत अर्चना बिचीतकर, मनीषा गावडे ,सुवर्णा चौरे, उज्वला मोरे, उषा बोंगाणे, रोहिणी नकाते, वंदना थिटे, अर्चना यादव, चंद्रकला नागणे, रोहिणी कामटे ,विजयादेवी शिंदे, हेमलता मांजरे, कांचन सरडे, पुण्यावरूननंदा तळेकर ,शोभा बिचीतकर, कामिनी बोंगाणे ,मनीषा ढेकळे, यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर
कार्यक्रमाची रूपरेषा सुहास वेदपाठक, प्रकाश माईनकर व नागनाथ काळे, सचिन रणशृंगारे यांनी स्टेजवर सांगितली सूत्रसंचालन विकास क्षीरसागर ,हनुमंत काळे यांनी तर पांडुरंग मस्के ,तानाजी तळेकर, नवनाथ देडगे ,संतोष लोंढे, कांतीलाल पन्हाळकर, वैजनाथ कदम, परमेश्वर राऊत, गणेश वाघ ,प्रकाश माईनकर यांनी आपले अनुभव सांगितले तर सर्वांच्या मनोरंजनासाठी विकास लोहार यांनी आपली गायनटीम आनून कार्यक्रमास रंग भरला.

हेही वाचा – पारेवाडी रेल्वे स्टेशन थांब्याबाबत खासदारांचे ठोस आश्वासन; रेल रोको तुर्त स्थगित मात्र बहिष्काराचा निर्णय मागणी पुर्ण होईपर्यंत ठाम; वाचा सविस्तर

कोंढेज येथे जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

सोमेश्वर कुर्डे ,धनंजय ताकमोगे ,सुनील दौंड ,अनिल गुटाळ, सुनील गुटाळ ,श्रीरंग मस्के ,बाळकृष्ण शेंडगे, रघुनाथ तळेकर ,संजय लेंडे, संजय काळोखे, स्वानंद थिटे ,मारुती देवकर, सुंदरदास बिचीतकर, गणेश वाघ, नीरज गाडे, भगवान सुरवसे ,अनिल पठाडे, श्रीहरी गुडे, राहुल रामदासी, ज्ञानेश्वर गुरव, सचिन रणशृंगारे समस्त केम मधील माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग्य असे नियोजन केले यावेळी माजी विद्यार्थी संजय पाटील, अनिल भिल्ल, पोपट हरदाडे ,उत्तरेश्वर पोकळे ,केम, मलवडी, सातोली, भोगेवाडी, पाथुर्डी मधील माजी विद्यार्थी इतर विद्यार्थी काही कामानिमित्त हजर नसले तरी कार्यक्रमाला प्रत्यक्ष फोनवरून हजेरी लावली कार्यक्रमाचे आभार विकास क्षीरसागर ,सुहास वेदपाठक व रोहिणी कामटे यांनी मानले.

litsbros