करमाळासोलापूर जिल्हा

श्री मकाई साखर कारखाना येथील शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिलाची रक्कम मिळावी अन्यथा आठ डिसेंबर रोजी पुन्हा तीव्र आंदोलन : – ॲड. राहुल सावंत अन्यथा कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्या खाजगी जंगम व स्थावर मालमत्तेवर बोजाची नोंद करण्यात यावी तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा : – शेतकऱ्यांची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री मकाई साखर कारखाना येथील शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिलाची रक्कम मिळावी अन्यथा आठ डिसेंबर रोजी पुन्हा तीव्र आंदोलन : – ॲड. राहुल सावंत

अन्यथा कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्या खाजगी जंगम व स्थावर मालमत्तेवर बोजाची नोंद करण्यात यावी तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा : – शेतकऱ्यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी:- श्री मकाई साखर कारखाना येथील शेतकऱ्यांना थकीत ऊस बील १५ % व्याजासहित मिळावे. आजरा सहकारी साखर कारखाना जि. कोल्हापूर या प्रमाणे श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन व विद्यमान चेअरमन, संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांच्या खाजगी जंगम व स्थावर मालमत्तेवर बोजाची नोंद करण्यात यावी. तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा, केंद्रीय ऊस नियंत्रण आणि भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा दि. 8/12/2023 पासून ॲड . राहुल सावंत, दशरथ आण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ सर, रवींद्र गोडगे यांच्या नेतृत्वाखाली थू थू आंदोलन करणार आहोत. तसेच लहान मुलं, महिला, जनावरे, कुंटुंबासहित आणि भजनी मंडळ सहित बेमुदत ठिय्या आंदोलन देखील करणार आहोत अशी माहिती ॲड. राहुल सावंत यांनी दिली.


श्री मकाई सहकारी साखर कारखाना लि . भिलारवाडी ता. करमाळा जि. सोलापूर येथील सन 2022 – 23 या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिलाची कारखान्याने 2500 रुपये प्रति टन जाहीर केलेली रक्कम 12 महिने होऊनही अद्याप पावेतो कारखान्याने अदा केलेली नाही. शिवाय कायद्या प्रमाणे शेतकऱ्यांना 14 दिवसात ऊस बिलाची रक्कम अदा केलेली नाही. याबाबत ऊस बिल मिळावे म्हणून वेळोवेळी मागणी करुन, निवेदने देऊन, आंदोलन करुन देखील शेतकऱ्यांना गळीता पासून 12 महिने होऊनही अद्याप पावेतो ऊस बिलाची रक्कम मिळाली नाही. यावर प्रभारी तहसीलदार व कारखाना पदाधिकारी, प्रशासन यांनी वेळोवेळी अनेक वेळा लेखी व तोंडी आश्वासनं दिलेली होते. तरी देखील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रभारी तहसीलदार व कारखाना यांनी संगनमताने फसवणूक केलेली आहे. तसेच या गाळप हंगामात सुमारे 159335 मे.टन गाळप झाले. अंदाजे दिड ते पावणेदोन लाख साखर पोत्याचे काय झाले? परस्पर विक्री झालेल्या साखरेचे पैसे तत्कालीन चेअरमन यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घेतले गेले आणि ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांची फसवणूक केली.
यावर प्रशासनाने नियंत्रण न ठेवल्यामुळे शेतकऱ्यांवर व त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच काही शेतकरी हे कारखाना व प्रशासन यांना कंटाळून व त्यांची झालेली आर्थिक पिळवणूक यामुळे त्यांच्यावर आत्महत्या सारखे मार्ग अवलंबवण्याची शक्यता वर्तावत आहेत.


सध्या आर आर सी कारवाईनुसार संपूर्ण कारखान्यावर करण्यात आली नाही. परंतु कारखाना हा सभासद मालकीचा आहे. त्यामुळे याला संपूर्ण जबाबदार तत्कालीन संचालक मंडळ आहे.
तरी शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल 15 टक्के व्याजासहित मिळावे अन्यथा आपण मकाई सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन व विद्यमान चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा, केंद्रीय ऊस नियंत्रण व भारतीय दंड संहिता नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कारखान्याचे तत्कालीन व विद्यमान चेअरमन, संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांच्या खाजगी जंगम व स्थावर मालमत्तेवर बोजाची नोंद करण्याची कारवाई करावी.
मा. औरंगाबाद खंडपीठात
CRIMINAL WRIT PETITION 2019 मधील याचिकेवर कारवाई करण्याचे आदेश दिलेला आहे.
तसेच तत्कालीन मा. राजगोपाल देवरा साहेब हे साखर आयुक्त असताना , त्यांनी तत्कालीन साखर संचालकांना आजरा कारखान्याची चौकशीचे आदेश दिले, त्याप्रमाणे गुन्हा रजि. नं. 5/2009 या क्रमांकाने आजरा पोलिस स्टेशनमध्ये जीवनावश्यक वस्तू अधिनियम तसेच केंद्रीय ऊस नियंत्रण नुसार फौजदारी गुन्हा नोंदविला. त्यानंतर कारखान्यावर जबाबदारी निश्चित करून आर आर सी कारवाईनुसार त्यात चेअरमन , संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक या सर्वांच्या खाजगी प्रॉपर्टी वर बोजा नोंद करण्याचा आदेश झाला होता.

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाचे रविवारी पुण्यात प्रकाशन; ‘बाबासाहेब करमाळा शहरात आले होते’ तो इतिहास उलगडणार!

माजी आमदार पुत्राच्या घरातच नळाला गटारीचे पाणी करमाळा नगरपालिकेचा भोंगळ कारभार मुख्याधिकारी लोंढे यांचे याकडे दुर्लक्ष

तरी मकाई सहकारी साखर कारखाना व संचालक मंडाळावर आजरा सहकारी साखर कारखाना प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश पारित करण्यात यावा ही विनंती. अन्यथा येत्या दि. 8 डिसेंबर 2023 रोजी थू थू आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत आमचे हक्काचे थकीत ऊस बील मिळत नाही तोपर्यंत आम्ही लहान मुलं, महिला, जनावरे, कुंटूंबासहित तसेच भजनी मंडळ घेऊन हे बेमुदत ठिय्या आंदोलन करमाळा तहसील कार्यालया समोर करणार आहोत . याची नोंद घ्यावी आणि होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल.
माहिती साठी प्रत :- मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. सहकार मंत्री, मा. महसूल मंत्री, मा. विरोधी पक्षनेते,मा. विभागीय आयुक्त, मा. साखर आयुक्त , मा. सहकार आयुक्त, मा. महसूल आयुक्त, मा. अतिरिक्त मुख्य सचिव सहकार आणि मार्केटिंग, मा. जिल्हाधिकारी सोलापूर, मा. पोलीस अधिक्षक, मा. तहसीलदार, मा. पोलीस निरीक्षक , मा प्रादेशिक सहसंचालक साखर . या सर्वांना हमाल पंचायत अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य ॲड .राहुल सावंत, शेतकरी कामगार संघर्ष समिती अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, दत्तकला शिक्षण संस्था अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर , शेतकरी संघटना अध्यक्ष रवींद्र गोडगे आणि शेतकऱ्यांनी या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.

litsbros

Comment here