करमाळासोलापूर जिल्हा

श्री किर्तेश्वर भगवंताची पालखी पंढरपूर येथे दाखल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री किर्तेश्वर भगवंताची पालखी पंढरपूर येथे दाखल

केत्तूर ( अभय माने) केत्तूर (ता.करमाळा) येथील पुरातन व प्रसिद्ध असलेल्या श्री किर्तेश्वर भगवंताचा पालखी सोहळा आज पंढरपूर येथे दाखल झाला.तिर्थक्षेत्र क्षेत्र केत्तूर येथील श्री किर्तेश्वर देवस्थान येथून ता.10 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पालखी सोहळ्याचे भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले होते.

केत्तूर नं. 1-केत्तूर नं 2-पारेवाडी-मांजरगाव- जेऊर-कंदर-टेंभुर्णी-वेणेगाव-करकंब-टाकळी पुनर्वसन-पंढरपुर असा प्रवास करत श्री किर्तेश्वर बाबाची पालखी पंढरपूर मुक्कामी दाखल झाली.केत्तूर व परिसरातील शेकडो वारकरी भक्तांनी या पालखी सोहळ्यात भाग घेतला होता.किर्तेश्वर देवस्थान च्या विश्वस्तांनी या वर्षी प्रथमच केत्तूर ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.

हेही वाचा – कोरोनात आई बाबा गमावलेल्या बालकांना जगदीशब्द फाउंडेशनचा मदतीचा हात; सलग चौथ्या वर्षी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

अंजनडोह व केडगाव येथील ऍट्रॉसिटीचे आरोपी मोकाट; करमाळा येथे निदर्शने, पिडीत विधवा महिलेचा आक्रोश

वारकरी भक्तांची जागोजागी जेवणाची,निवासाची सोय करण्यात आली होती.वारकरी भक्तांनी पंढरपूर नगरप्रदिक्षणा,श्री किर्तेश्वर भगवंताच्या मुर्तीला चंद्रभागा स्नान करून श्री विठ्ठलाचे मुखदर्शन केले.

litsbros