करमाळासोलापूर जिल्हा

जे.के फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांचा सहभाग

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जे.के फाउंडेशनच्या शिबिरात १०५ रक्तदात्यांचा सहभाग

वाशिंबे प्रतिनिधी :-देशभक्त स्वर्गीय जगन्नाथ कृष्णाजी भोईटे यांच्या ५६ व्या स्मृतीदिनानिमित्त शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात १०५ युवकांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉ.सुदर्शन नवनाथ झोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ बापू झोळ,विद्यालयाचे मुख्यध्यापक रमेश‌ यादव,शेतकरी संघटना भाऊसाहेब झोळ,भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब झोळ,सोसायटी चेअरमन राजाभाऊ झोळ,कल्याण

मगर,विलास झोळ,आण्णासाहेब टापरे,ज्ञानदेव झोळ,संतोष झोळ,अजित झोळ,सुभाष झोळ,योगेश झोळ,आण्णा झोळ आदीनीं स्मृतिदिनानिमित्त भोईटे गुरूजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

हेही वाचा – कुंभेज येथे विद्यार्थ्यांनी घेतली आगळीवेगळी प्रतिज्ञा; वाचा सविस्तर

करमाळा बाजार समितीत उडदाची आवक सुरू, यंदा विक्रमी आवक होणार; वाचा किती मिळतोय दर?

सामाजिक बाधिंलकितून आरोग्य विषयी असे समाज उपयोगी कार्यक्रम दरवर्षी गावात फाउंडेशन राबत आहेत.आतापर्यंत युवक मित्रांच्या मदतीने दरवर्षी रक्तदान शिबिर घेत ६९३ युनीट रक्त संकलन करून रक्तदानाचे सारखे मोठे काम जे.के.फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल भोईटे यांनी केले आहे.‌ या शिबिरात गावातील युवकांनी उत्फुर्त सहभाग नोंदवला.

litsbros