महाराष्ट्र

विहिरीचे बांधकाम चालू असताना अचानक कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले चार कामगार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

विहिरीचे बांधकाम चालू असताना अचानक कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले चार कामगार

इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी इथं विहिर खचून मोठी दुर्घटना घडली आहे. काम चालू असताना विहिरीची रिंग आणि मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली चार जण अडकले आहेत. या अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य केले जात आहे.

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावात विहिरीचं रिंग मारण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. यामध्ये इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील चार कामगार ढिगार्‍याखाली अडकले गेले आहेत. ही घटना काल दुपारी घडली, पण याचा उलगडा रात्री उशिरा झालेला आहे.

विहिरीची रिंग मारण्याचं काम सोमनाथ लक्ष्मण गायकवाड वय 32 वर्ष, जावेद अकबर मुलानी वय 30 वर्ष,परशुराम बन्सीलाल चव्हाण वय 30 वर्ष आणि मनोज मारुती चव्हाण वय 40 वर्ष हे चार करीत होते. अचानक रिंग आणि मातीचा ढिगारा कोसळला. त्या ढिगार्‍याखाली हे चारही जण कालपासून अडकले आहेत.

चारही कामगार नेहमीप्रमाणे आपल्या घरी सायंकाळी परतले नाही तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि हा शोध शेवटी त्या विहिरी जवळ येऊन थांबला. त्या ठिकाणी त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या मात्र ते चार लोक आणि त्यांचे मोबाईल मात्र लागू शकले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगार्‍याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली. काही जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीने हा ढिगारा आता बाजूला करण्याचं काम सुरू आहे. आमदार दत्तात्रय भरणे तहसीलदार श्रीकांत पाटील ,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना या संदर्भात कळविण्यात आले असून एनडीआरएफ पथक आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे.

litsbros

Comment here