दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने बैलजोडी जागीच ठार
मांडवे, ता. जुन्नर येथील पुताचीवाडी येथे दोन बैलांचा विजेचा धक्का लागून बैलजोडी जागीच ठार झाली असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
पुताचीवाडी येथील भीमा विठ्ठल दाभाडे यांच्या शेतातील विदुत खांबाच्या ताणाला वीजप्रवाह आल्याने बैलाना विजेचा धक्का लागून दोन्ही बैले जागीच ठार झाली. सदर घटना समजताच विज महावितरण कंपनीचे आळेफाटा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता संतोष तळपे, ओतूर शाखा अभियंते ऋषीकेश बनसोडे, कोपरे मांडवे फिडरचे वायरमन सचिन देठे तसेच पशुवैधकीय अधिकारी डॉ. सचिन राहणे व डॉ. सी. बी. पथवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सदर शेतकऱ्यांला शासनाने व विज महामंडळाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, मांडवे, मुथाळणे, पुताचीवाडी गृप ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर गोडे, उपसरपंच मच्छिंद्र तळपे, मंगेश भांगरे, ठमाजी कवटे, अमर मुठे, दादाभाऊ दाभाडे, संजय भांगरे, नाना बुळे, गोरक्षनाथ भांगरे, लक्ष्मण भांगरे, चंद्रकांत बुळे, बबन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन केली. सदर शेतकऱ्यांला तातडीने आर्थिक मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी सर्वानी दिला.
Comment here