करमाळ्यात मोहरम सण हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम ठेवून उत्साहात साजरा
करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख);
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडविणारा मोहरम सण आज करमाळा येथे शांततामय पद्धतीने उत्साह वातावरणात पार पडला
करमाळा शहर व तालुक्यात मोहरम चा सण उत्सवात व शांततेत साजरा झाला असुन करमाळा शहरात मोहरम निमित्त पाच दिवसापुर्वी सवारी प्रतिस्थापणा करण्यात आली असुन यामध्ये भुईकोट किल्ल्यातील नालसाहेब सवारी, मोहिद्दीन तालीम येथील सवारी कुंभारवाडा येथील अल्लाऊद्दीन साहेब ची सवारी तसेच मौहल्ला गल्ली येथील फरीद मास्तर यांची सवारी खाटीक गल्ली येथील नालेहैदर सवारी खडकपुरा येथील माहुले यांची सवारी तर समद कुरेशी यांची सवारी तसेच रंभापुरा येथील दुधाट यांची सवारी मौलालीनगर येथील मदारी समाजाची सवारीआदी ठिकाणी स्थापना करण्यात आली.
किल्ला वेस, सुमंथनगर, मोहल्ला गल्ली,खाटीक गल्ली, सुर्यकांत चिवटे आदी ठिकाणी डोले बसविण्यात आले असुन वरील सवारीची सवाद्य मिरवणूक शांततेत काढण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने भुईकोट किल्ल्यातील मानाची नालसाहेब सवारी तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतिक म्हणुन बघितले जाते अशी कुंभारवाडा येथील कुंभाराची अल्लाऊद्दीन साहेब सवारी ची मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी अनेक हिंदू मुस्लिम भावीक रस्त्यावरुन दर्शन घेताना दिसत होते.
मोहरम कमिटीच्या वतीने पंचायत समितीचे सभापती अतुल भाऊ पाटील तसेच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव जगताप यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला मोहरम चा सण शांततेत पार पाडण्यासाठी नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी
माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय शिंदे करमाळा अर्बन बॅकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार भा,ज,पक्षाचे नेते रामा ढाणे अलसहारा सोशल ग्रुप चे संस्थापक हाजी समीर शेख राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे शहर उपाध्यक्ष आजाद शेख हाजी फारुक बेग मुकेश हलवाई जाकीर वस्ताद
हेही वाचा – करमाळा तालुक्यावर वरुणराजा रुसला; शेतकरी चिंतेत, पावसाची प्रतिक्षा
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवेगव्हाण येथे विविध सामाजिक उपक्रम
सारंग परदेशी बबन दुधाट बिलाल कुरेशी जाफर घोडके उमर मदारी देवीदास घोडके माहुले ज्योतीराम ढाणे इस्माईल सय्यद महमदहाफीज कुरेशी मुस्तकीन पठान जिशान कबीर ईमत्याज पठान सुरज शेख, मैनुद्दीन शेख समीर दाऊद शेख, पै,समीर शेख आयुब शेख जावेद पठाणआदी जणांनी परिश्रम घेतले पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे पोलीस उपनिरीक्षक माहुरकर यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता
याशिवाय करमाळा तालुक्यात पांडे सालसे हिसरे आवाटी जेऊर केम कंदर पारेवाडी, गुळसडी आदी भागात मोहरम सण उत्साहात साजरा करण्यात आला.
Comment here