रेल्वेने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात पूर्वी प्रमाणे सुट द्यावी; ॲड विघ्ने यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन
केत्तूर (अभय माने ) कोरोना महामारीच्या काळात रेल्वे विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच अपंगासाठी रेल्वे भाड्यामध्ये मिळणारी 50 % सूट मार्च 2020 पासून बंद केलेली आहे. ही बंद केलेली सूट पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड.अजित विघ्ने यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिवसेंदिवस सर्वच बाबतीत महागाईचा आगडोंब सर्वच बाबतीत वाढत आहे तर दुसरीकडे बँकांमधील ठेवीवर मात्र व्याजदर कमी होत आहे त्यामुळे जेष्ठ नागरिकांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे विस्कळीत होत आहे.
रेल्वे भाड्यात यापूर्वी मिळणारी सवलत काढून टाकल्याने ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आवश्यक कामासाठीही रेल्वे प्रवास करणे जिकीरीचे होत आहे त्यातच रेल्वे प्रशासनाने सुपरफास्ट रेल्वेचे नावाखाली सर्वच रेल्वे भाड्यात भरमसाठ वाढ केली आहे.त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना असणारी पन्नास टक्के सवलत त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
हेही वाचा – राजुरीच्या कुस्ती आखाड्यात करमाळयाचे आजी माजी आमदार; लाखाची कुस्ती बरोबरीत..
करमाळा शहरासाठी 6 कोटी वीस लाखाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर; वाचा सविस्तर
” एकीकडे राज्य सरकार 75 वर्षांपूढीत जेष्ठ नागरिकांना एसटीमध्ये मोफत प्रवास तर महिलांना 50 टक्के (हाफ तिकीट) सवलत देत असताना, केंद्र सरकार मात्र दिलेली सवलत मागे का घेत आहे असा सवाल ज्येष्ठ नागरिकातून विचारला जात आहे.”
Comment here