करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

राणा नोबल व ईगल लीप इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन व आनंदी बाजार उत्साहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राणा नोबल व ईगल लीप इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन व आनंदी बाजार उत्साहात संपन्न

करमाळा(प्रतिनिधी); दिनांक 9/03/2023 वार गुरुवार रोजी करमाळा येथील राणा नोबल स्कूल व इगल लिप इंग्लिश प्रीस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शन व आनंदी बाजार चे आयोजन केले होते.

स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीची ओढ आणि आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेमध्ये मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी गुरुवार दिनांक 9/03/ 2023 रोजी आनंदी बाजारचे आयोजन केले होते या ऍक्टिव्हिटीचा मनसोक्त आनंद पालक व विद्यार्थी यांनी घेतला.


यावेळी सर्व विद्यार्थी शेतकरी वेशभूषित आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक सर यांनी केले.

हेही वाचा – कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये सावळा गोंधळ; जनशक्तीच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये तब्बल २१ अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर

वडशिवणे येथे एकास पाच जणांनी लोखंडी गजाने केली मारहाण; चारचाकी फोडून रोख रकमेसह सोन्याची चैन काढून घेतल्याची करमाळा पोलिसांत फिर्याद

यावेळी प्रा.संजय जाधव सर ,प्राध्यापक कुंभार सर, करमाळा तालुका पंचायत समितीचे विषय तज्ञ आदलिंग सर तसेच गुरुदेव शिक्षण संस्था बारामतीचे अध्यक्ष महेश दिवेकर सर ,उपाध्यक्ष डॉक्टर विजय बागल, मुख्याध्यापिका स्वप्नाली बागल, सर्व शिक्षक ,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here