माढासोलापूर जिल्हा

कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये सावळा गोंधळ; जनशक्तीच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये तब्बल २१ अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये सावळा गोंधळ; जनशक्तीच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये तब्बल २१ अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर

कुर्डुवाडी (प्रतिनिधी);
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी पंचायत समिती मध्ये जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी काल अचानक स्टिंग ऑपरेशन केले असता २१ विभाग प्रमुख पदाधिकारी आणि कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असल्याचे अतुल खूपसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील हे शेतकऱ्यांची कामे घेऊन काल गुरुवार दि.२ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता गेले असता या गटविकास अधिकारी संताजी पाटील आसाम/गुहावटी येथे अभ्यास दौरा करण्यासाठी गेले असल्याचे समजले.

यावेळी त्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी दीपक चिलवंत यांची भेट घेतली, मात्र पंचायत समितीमध्ये अनेक विभाग प्रमुख आणि कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी हजेरी पुस्तक आणि हालचाल रजिस्टर एका शिपायास आणावयास सांगितले, आणि शिपायासोबत एक कार्यकर्ता देखील पाठविला.

यावेळी झालेल्या व्हिडिओ रेकॉर्डमध्ये धक्कादायक बाब समोर आली असून काही ठिकाणी नुसतेच रजेचे अर्ज बिना तारखेचे लिहिलेले आढळून आले तर काही ठिकाणी दोन-तीन दिवस अगोदरच्या सह्या केल्याचे निदर्शनास आले, शिवाय हालचाल रजिस्टर कसल्याही नोंदी केल्याचे दिसून आले नाही.

मुळातच शासन जीआर सोमवार व बाजारचा दिवस या दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात हजर राहणे गरजेचे असले आहे. शिवाय आठवड्याचे पाच दिवस कामाचे करत रोजच्या दिवसाच्या कामाच्या वेळा वाढवल्या आहेत.

मात्र या दोन्ही बाबींना केराची टोपली दाखवत कर्मचारी पंचायत समितीमध्ये ‘आओ जाओ घर तुम्हारा’ या उक्तीनुसार कधीही येतात आणि कधीही जात असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान यावेळी उप अभियंता जलसंधारण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, गटशिक्षणाधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी कुर्डवाडी आणि टेंभुर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी हे सात विभागप्रमुख व यांच्यासह इतर कर्मचारी असे एकूण २१ जण सकाळी ११.३० वाजल्यानंतरही कार्यालयात हजर नव्हते.

हेही वाचा – वडशिवणे येथे एकास पाच जणांनी लोखंडी गजाने केली मारहाण; चारचाकी फोडून रोख रकमेसह सोन्याची चैन काढून घेतल्याची करमाळा पोलिसांत फिर्याद

कणेरी मठातील मृत गायींचे रिपोर्टींग करण्यासाठी गेलेले पत्रकारावर हल्ला करणार्‍यांना तत्काळ अटक करा; करमाळा तालुका पत्रकार संघाची मागणी

शिवाय यांचा कोणताही रजेचा अर्ज नव्हता किंवा हालचाल रजिस्टर मध्ये नोंद नव्हती. काहींनी पळत पळत येऊन घाम पुसत सह्या केल्या. दरम्यान या सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना सहाय्यक गट विकास अधिकारी चिलवंत यांनी कारणे दाखवा नोटीस दिली असून यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी अतुल खूपसे पाटील यांनी केली आहे. यावेळी जनशक्तिचे संपर्क प्रमुख राणा वाघमारे जनशक्तीचे विभाग प्रमुख बापू धोत्रे, समाजसेवक मोहन गायकवाड व शेतकरी उपस्थित होते.

कुर्डूवाडी पंचायत समितीमध्ये हुकूमशाहीचा बाजार मांडला आहे. राजकारणी लोकांच्या दबावाखाली येऊन गोरगरीब व सामान्य जनतेची कामे केली जात नाहीत. सोमवार आणि गुरुवार कामाचा आणि कार्यालयात उपस्थित राहण्याचा दिवस असून देखील विभाग प्रमुख आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित नसतात. त्यामुळे इतर दिवशी तर दांड्या मारण्याला प्राधान्य देत असल्याचे जनता सांगत असते. त्यामुळे या कारवाईचा अहवाल घेऊन यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करणार आहे.

– अतुल खूपसे पाटील
संस्थापक, जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य

▪️ स्टिंग ऑपरेशन करण्याची तिसरी वेळ
– याबद्दल जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी फेब्रुवारी २०२१, फेब्रुवारी २०२२ आणि काल २ मार्च २०२२ अशा तीन वेळा पंचायत समितीमध्ये जाऊन कर्मचारी गैरहजर दिसतात स्टिंग ऑपरेशन करत वरिष्ठांना गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले होते.

litsbros

Comment here