करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

रमजान निमित्त जेऊर येथे महिलांसाठी लोकस्वराज प्रतिष्ठान तर्फे रोजा इफ्तार पार्टी संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रमजान निमित्त जेऊर येथे महिलांसाठी लोकस्वराज प्रतिष्ठान तर्फे रोजा इफ्तार पार्टी संपन्न

जेऊर(प्रतिनिधी); रमजान निमित्त जेऊर येथे महिलांसाठी लोकस्वराज प्रतिष्ठान तर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

जेऊर येथील मुस्लिम महिलांनी इफ्तार पार्टीस खूपच चांगला प्रतिसाद दिला अशी माहिती लोकस्वराज प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ऍड. सविता शिंदे यांनी दिली.
हिंदू मुस्लिम ऐक्य व सौहार्द टिकविणे व वाढविणे यासाठी मुस्लिम महिलांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणे आवश्यक आहे. त्यासही इफ्तार पार्टी सारखे उपक्रम उपयुक्त ठरतात.

मुस्लिमतरांनी विशेषतः देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंनी असे उपक्रम राबवले पाहिजेत असेही ऍड. सविता शिंदे म्हणाल्या. मुस्लिम पुरुषांसाठी बहुतेक वेळा इफ्तार पार्टीचे औओजन केले जातेच पण महिलांसाठी मात्र तसे होत नाही. महिलांना देखील आशा उपक्रमात सहभागी करून घेतले पाहिजे.

हेही वाचा – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेतून वांगी गावचे सुपुत्र चि.श्रीराज देशमुख यांची कृषी अधिकारी म्हणून निवड

करमाळा उपजिल्हा रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा; नियुक्ती असताना दीड वर्षापासून डॉक्टर गैरहजर; वाचा कुटीर रुग्णालयाचा पंचनामा!

या हेतूने आपण रोज इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. मागील वर्षीही करमाळा येथे आपण महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते अशी माहितीही ऍड. सविता शिंदे यांनी दिली.
जेऊर येथे प्रथमच असा उपक्रम राबविल्या बद्दल मुस्लिम महिलांनी आनन्द व्यक्त केला.जेऊर येथील उपक्रमासाठी आरती शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रियंका खटके, सुरेखा शिंदे इ. महिलांनी सहकार्य केले.

litsbros

Comment here