महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेतून वांगी गावचे सुपुत्र चि.श्रीराज देशमुख यांची कृषी अधिकारी म्हणून निवड
करमाळा (प्रतिनिधी):
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला,महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या 626 उमेदवारांच्या मधून काल झालेल्या मुलुखाती मधून 203 जणांची अंतिम निवड झाली आहे त्यामध्ये वांगी नं.1 ता-करमाळा येथील सुपुत्र चि. श्रीराज नानासाहेब देशमुख यांची 56 व्या रँक नुसार निवड झाली आहे.
या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे कृषिसेवा गट-अ व कृषिसेवा गट -ब संवर्गातील पदांसाठी निवड केली जाणार आहे. वांगी गाव चे श्रीराज देशमुख यांचे शालेय शिक्षण अकलूज येथे तर महाविद्यालयिन शिक्षण कोल्हापूर येथील ऍग्री कॉलेज मध्ये पार पडले आहेत तर Msc ऍग्री चे शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठ मधून पार पडले आहे. चि. श्रीराज देशमुख यांच्या यशाचे वांगी ग्रामस्थांनी स्वागत केले आहे व पेढे वाटून अभिनंदन केले आहे.
Comment here