महाराष्ट्र

पुढचे 4 दिवस पावसाचं धुमशान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पुढचे 4 दिवस पावसाचं धुमशान

मोचा चक्रीवादळ आज पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तीन राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. एकीकडे वाढणारा उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस यामुळे वातावरणात अनेक बदल होत आहेत. पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

हवामान विभागाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना अलर्ट दिला आहे. मोचा चक्रीवादळामुळे हवामान बदलत आहे. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ आणि छत्तीसगड भागात आज मुसळधार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अवकाळी पावसानं अतोनात पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

बंगालचा उपसागर, द.अंदमान समुद्रात ८ मे ला कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. तर ९ मे पर्यंत ते अजून तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे प्रवास सुरू होईल. अंदमान, निकोबारला ८-१२ मे ला मुसळधार-अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

litsbros

Comment here