करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

प्रशांत ननवरे याचे यूपीएससीत यश सत्कार; रिपाई च्या वतीने सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्रशांत ननवरे याचे यूपीएससीत यश सत्कार; रिपाई च्या वतीने सत्कार

करमाळा(प्रतिनिधी );
UPSC आणि MPSC मध्ये यश संपादन करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थानी मानून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळवता येते.
आज भंडीशेगाव ता.पंढरपूर येथील केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेत ,संख्याकी शास्त्रामध्ये देशात 28 वा रॅंक व राज्यात दुसरा क्रमांक पटकावून आंबेडकरी विचारधारेची मान उंचावणारा व जिल्ह्याचे नाव देशपातळीवर झळकणारा मा.प्रशांत ननवरे यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ कामगार आघाडीचे पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.यशवंतभाउ गायकवाड म्हणाले.

तरुणांनी युपीएससी,व एम पी एस सी परिक्षेत यश मिळवण्यासाठी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थानी मानून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळवता येते,याचे उदाहरण म्हणजे मा.प्रशांत ननवरे साहेबांनी मिळालेले यश ही गोष्ट बहुजन समाजातील तरुणांना आदर्श व प्रेरणा दायी आहे.

त्यामुळे समाजातील कुठल्याही तरुणांनी यश मिळवल्यास, सामाजिक बांधिलकीची जान म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ कामगार आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

त्यावेळी बोलताना सत्कारमुर्ती मा.प्रशांत ननवरे म्हणाले माझी परिस्थिती हालाखीची असताना मी परिस्थितीचे भांडवल न करता,आपल्याला आयुष्यात काय तरी करून दाखवायचे आहे.त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून धेयाच्या दिशेने वाटचाल केली, हे करत असताना मार्केटमधल्या कुठल्याही अफवांना बळी न ठरता , ” द सिंबोल ऑफ नॉलेज” चे प्रतीक असणारऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला एक एक पुस्तक २५ वेळा वाचले , यश कधी मिळाले हे समजलं सुध्दा नाही.पुढे मिळालेल्या संधीचे सोने करून बहुजन समाजातील तरुणांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा – करमाळ्याचे सुपुत्र उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार जाहीर

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणगौरव व सत्कार कार्यक्रम संपन्न

त्यावेळी जनसेवा संघटनेचे अध्यक्ष मा हारीभाऊ गायकवाड, जनसेवा संघटनेचे उपाध्यक्ष मा.पै भारत सोनवणे, शंकर गायकवाड,भंडीशेगावचे ग्रा.पं.सदस्य,मा मंगेश ननवरे,मा.अमर ननवरे,सचिन ननवरे,माजी सैनिक मा.शिवदास बाबर, वडील मा.विजय ननवरे,आई मा.विद्याताई ननवरे,व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

litsbros