करमाळाकेमशैक्षणिकसोलापूर जिल्हा

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणगौरव व सत्कार कार्यक्रम संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणगौरव व सत्कार कार्यक्रम संपन्न

केम प्रतिनिधी- श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी समाधान बजरंग कुर्डे यांची तलाठी पदी निवड झाल्याबद्दल आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा केम केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.

श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी समाधान बजरंग कुर्डे यांची तलाठी पदी निवड झाली तसेच समाधान बजरंग कुरडे या माजी विद्यार्थ्याने सन 2013-2014 मध्ये थाळीफेक शासकीय महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेचे नाव राज्यस्तरावर चमकवले.

माजी विद्यार्थी समाधान बजरंग कुर्डे यांची तलाठी पदी निवड झाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर, प्रहार तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, केम भाजपा अध्यक्ष श्री गणेश आबा तळेकर, सामाजिक कार्यकर्ते विष्णू तळेकर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सागरराज तळेकर तसेच प्रशालाचे मुख्याध्यापक कदम एस.बी सर यांनी श्रीफळ ,शाल ,गुलाब पुष्प देऊन‌ या माजी विद्यार्थ्याचा सत्कार केला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा केम‌ केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक वीरधवल गाडे, लहान गट कुस्ती स्पर्धेत प्रथम सानिका शिंदे, मुलांमध्ये लहान गट कुस्ती स्पर्धेत गट प्रथम वीर तळेकर , लहान गट लंगडी सांघिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक कॅप्टन ज्ञानदा पळसे आणि मोठा गट कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक कॅप्टन उत्तरेश्वर कोरे आणि कबड्डी स्पर्धेतील सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा – करमाळ्याचे सुपुत्र उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार जाहीर

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या विकास निधीतून वीट येथे ‘इतक्या’ लाखांच्या विकास कामाचे उद्घाटन

माजी विद्यार्थी बजरंग समाधान कुर्डे यांनी स्पर्धा परीक्षा आणि आपल्याला आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जी.के जाधव सर यांनी केले.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

litsbros

Comment here