करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
पारेवाडीच्या अजिंक्य दिवेकर यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट समाज माध्यम समन्वयक पुरस्कार
केत्तूर (अभय माने); पारेवाडी (ता. करमाळा) येथील अजिंक्य प्रदिप दिवेकर यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट समाज माध्यम समन्वयक हा पुरस्कार मिळाला आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक शाखा येथे कार्यरत असून ठाणे जिल्ह्यातील मतदार नोंदणीची टक्केवारी वाढावी व जास्तीत जास्त लोकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी ते समाज माध्यमांद्वारे प्रसिद्धी करण्याचे काम पाहत आहेत.
त्यासाठी त्यांना महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून राज्यस्तरीय पुरस्कार व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.या कामासाठी त्यांना ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीम अर्चना कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Comment here