करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

नेताजी सुभाष विद्यालयात एच.एस. सी./एस.एस.सी.शुभचिंतन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

नेताजी सुभाष विद्यालयात एच.एस. सी./एस.एस.सी.शुभचिंतन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

केत्तूर ( अभय माने) “जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर जात असताना संस्कार सोबत घेऊन परीक्षांचे एकेक शिखर पार करीत मोठ्या पदावर विराजमान होण्याचे स्वप्न पहावे व ते सत्यात उतरवण्याचा आटोकाट व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते” असा संदेश व मनोगत येथील केंद्रप्रमुख मा. विकास काळे यांनी व्यक्त केले. ते येथील नेताजी सुभाष विद्यालयात आयोजित एच.एस.सी.व एस.एस.सी. विद्यार्थी शुभचिंतन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते.

यावेळी करमाळा माजी सभापती बापूसाहेब पाटील आणि मकाई साखर कारखान्याचे कार्यकारी अधिकारी हरिश्चंद्र खाटमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सहशिक्षक के.सी.जाधवर यांनी केले. यानंतर सरपंच सचिन वेळेकर, उपसरपंच भास्कर कोकणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ऍड.संतोष निकम यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून संस्थेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

गेल्या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी आणि बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी विविध मान्यवरांनी जाहीर केलेली बक्षीसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच यावर्षी इयत्ता बारावीतील गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्राप्त विद्यार्थी कु. नंदिनी मोरे व अभिनव आगवणे यांना रोख बक्षीस देऊन त्यांना गौरवण्यात आले.

सन 1998 मधील माजी विद्यार्थी बॅच कडून व शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून शाळेच्या आवारात पेवर ब्लॉक बसवून दिले त्याचा शाळार्पण कार्यक्रम घेण्यात आला .
गावातील नागरिक महेश महामुनी व सौ.रूपाली महामुनी यांनी शाळेसाठी सुमारे 18000 रुपये किमतीचा साऊंड ऍम्प्लिफायर भेट दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी व येथील “जिव्हाळा” फाउंडेशन मार्फत नव्यानेच सुरू करण्यात आलेला “आदर्श शिक्षक पुरस्कार” शाळेतील सहशिक्षक आर. डी.मदने यांना कार्यवाहक मा. निवास उगले, मा.शहाजी पाटील व मा. राजाराम ठोंबरे यांच्या हस्ते देण्यात आला.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानासाठी रोख स्वरूपात देणगी देणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनकु. ऋतुजा खाटमोडे, कु. दीक्षा खारतोडे, कु.अनुजा गीते, सार्थक कानतोडे,कु. नंदिनी मोरे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. तर शिक्षक मनोगतात प्रा.एन.एम.पवार, प्रा.के.पी धस यांनी आपले विचार व्यक्त केले.प्रतिष्ठित नागरिक मा.हरिश्चंद्र खाटमोडे, मा. आबासाहेब येडे यांनीही आपले मत मांडले.

हेही वाचा – तक्रार येताच तहसीलदार ठोकडे संतापल्या, कुणबी दाखले काढताना नागरिकांना लूट नका, मोडी वाचकांच्या मानधनाचा प्रस्ताव दाखल

शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका भाजपा यूवामोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी

कार्यक्रमाला किरण निंबाळकर, आबासाहेब येडे, मनोहर गुंडगिरे, पत्रकार राजाराम माने, महेश पवार,ग्रा.स.सौ.शुभांगी विघ्ने, सौ.कमल पवार, सौ. प्रियंका नवले, मा.शहाजी पाटील, प्रा.राजेश कानतोडे, लक्ष्मण खोमणे, गणेश कोकणे,सौ. दिपालीताई डिरे, सौ. कीर्ती पानसरे, महावीर राऊत, राजेंद्र काळे, सौ.संचिता खोडवे, सौ.अलका खोडवे, शाळेचे प्राचार्य डी.ए. मुलाणी, पर्यवेक्षक बी.जी.बुरुटे, ज्येष्ठ शिक्षक एल.बी.महानवर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.सी. जाधवर यांनी केले तर आर.डी.मदने यांनी आभार मानले.

litsbros