करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

भाजपा महिला आघाडी आयोजित हळद कुंकू समारंभ उत्साहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भाजपा महिला आघाडी आयोजित हळद कुंकू समारंभ उत्साहात संपन्न

करमाळा – भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने हळद कुंकू कार्यक्रम किल्ला विभाग महादेव मंदिरासमोर नगरपालिका सभागृह येथे
उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन महिला आघाडीच्या करमाळा शहराध्यक्षा रेणुकाताई राऊत यांनी केले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल,करंजे गावचे सरपंच काकासाहेब सरडे,महिला आघाडीच्या संगीता नष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की, महिला आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असून पुरुषांच्या बरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.शिक्षण नोकऱ्या यामध्ये आज मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. सातत्य व चिकाटी या गुणांमुळे महिला सर्व ठिकाणी अग्रेसर आहेत. सरकारने महिलांना ३३% हक्काचे आरक्षण जाहीर केले आहे याचा लाभ देशातील सर्व महिलांना होणार आहे.

हेही वाचा – परदेशी दांपत्याकडून श्रीराम प्रतिष्ठानचे आभार ,प्रतिष्ठानच्या वतीने परदेशी दांपत्याचा लग्नाचा वाढदिवस साजरा

वीट येथे रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी रस्ता रोको आंदोलन आचार संहिता पूर्वी योजना मार्गी लागली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार -शेतकऱ्यांचा एल्गार

तसेच महिलांच्या कुठे काही अडी-अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी आपण सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा माया भागवत मॅडम यांनी केले.यावेळी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रेणुका राऊत,संगीता नष्टे,माया भागवत,नवनियुक्त शहर उपाध्यक्षा राधिका डोके,शारदा परदेशी,भोसेकर मॅडम, आदी उपस्थित होत्या .

litsbros