करमाळासोलापूर जिल्हा

नद्या-जोड प्रकल्पाचे प्रणेते व जागतिक अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर : यशवंतभाऊ गायकवाड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

नद्या-जोड प्रकल्पाचे प्रणेते व जागतीक अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर : यशवंतभाऊ गायकवाड

केत्तूर, (अभय माने ) हिंगणी (ता. करमाळा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी वैचारिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख व्याथ्याते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ कामगार आघाडीचे पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.यशवंतभाऊ गायकवाड म्हणाले,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपला शेतकरी बांधव सुजलाम सुफलाम होण्यासाठी वआपल्या देशामध्ये निर्माण होणारी नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नद्याजोड प्रकल्पाची सुचना दिली.

ज्यामुळे उन्हाळ्यात व पावसाळ्यात पुर येऊन शेतकर्यांची होणारी नुकसान टाळता येऊ शकेल व उन्हाळ्यात व पावसाळ्यात कोरड्या पडणार्या नद्यांना पाणी वळवल्यामुळे शेतकर्यांचे अर्थकारण ही सुधारेल.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे नद्याजोड प्रकल्पाचे प्रनेते आहेत.बाबासाहेबांनी लंडनमध्ये असताना प्राॅब्लेम ऑफ रुपी नावाचा प्रबंध पुर्ण केला,त्याच्यावरती जगातले अनेक अर्थतद्ज्ञ अभ्यास करत आहेत, एव्हढंच नाही तर आपल्या देशाचे संपूर्ण अर्थकारण बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी प्रबंधावरती अवलंबून आहे.

यावेळी कार्यक्रमाचे आध्यक्ष जिल्हा परिषद सदस्या सौ.सवितादेवी राजेभोसले होत्या.त्यावेळी राजेभोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुरवातीला महामानवाच्या प्रतीमांना पुष्प हार घालून मान्यवरांनी अभिवादन केले.सुरवातीला शाळेतील अनेक मुला मुलींचे भाषणे झाली.

हेही वाचा – करमाळ्यातील पोथरे गावात अनोखा उपक्रम! 300 आई- वडीलांची रथात बसवून काढली मिरवणूक

करमाळा उपजिल्हा रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा; नियुक्ती असताना दीड वर्षापासून डॉक्टर गैरहजर; वाचा कुटीर रुग्णालयाचा पंचनामा!

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळीराम गायकवाड यांनी केले.त्यावेळी हिंगणीगावचे सरपंच,उपसरपंच यांचेसह बहुसंख्येने ग्रामस्थ व विशेष महिलांचा सहभाग होता.त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमीटी व शिवशाही संघाच्या तरुणांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

छायाचित्र -हिंगणी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी विचार मांडताना यशवंतभाऊ गायकवाड

litsbros

Comment here