करमाळा

करमाळ्यातील पोथरे गावात अनोखा उपक्रम! 300 आई- वडीलांची रथात बसवून काढली मिरवणूक 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळ्यातील पोथरे गावात अनोखा उपक्रम! 300 आई- वडीलांची रथात बसवून काढली मिरवणूक 

करमाळा (प्रतिनिधी): पोथरे येथील हनुमान भजनी मंडळाच्या वतीने आई- वडिलांविषयी अनोखा उपक्रम राबवत गावातील 150 कुटुंबातील 300 आई-वडीलांचा रथात बसवून मिरवणूक काढत पाद्य पूजा केली आहे. या शोभायात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभागी होऊन आई वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

पोथरे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. यामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. आई- वडिलांची पारंपारिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. भैरवनाथ मंदिर येथून आई- वडिलांना ट्रॅक्टरमध्ये खुर्चीत बसून त्यांच्या मुलांकडून पूजा करून तीन प्रदक्षिणा करून त्यांच्या चरणावर नतमस्तक होत पुष्पहार देत सन्मान करण्यात आला.

यावेळी ऍड. डॉ. बाबुराव हिरडे, प्रा. आजिनाथ झिंजाडे, पोलिस पाटील संदिप शिंदे, ऍड. नानासाहेब शिंदे, शिवरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र झिंजाडे, हरीश कडू, प्रशांत ढवळे, पत्रकार नाना पठाडे यांनी आई- वडिलांच्या ऋणाविषयी मनोगत व्यक्त केले. आबासाहेब भांड म्हणाले, ‘वेदामध्ये व संत वाड्मयामध्ये आई वडिलांचे स्थान अग्रगण्य आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांची गावातून मिरवणूक काढून पाद्यपूजा केली.’

गायनाचार्य गंगाधर शिंदे म्हणाले, ‘भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केल्याने जगाचे दैवत पंढरीचा विठ्ठल स्वतः पुंडलीकाला भेटण्यास येत असेल तर त्यांची सेवा किती श्रेष्ठ आहे. त्यामुळेच आम्ही आई-वडिलांविषयी कृतज्ञता सोहळा साजरा केला.’ पत्रकार पठाडे म्हणाले, ‘आई- वडिलांच्या निधनानंतरचा विधी मोठ्या थाटात करण्यापेक्षा जिवंतपणे त्यांना हा आनंद द्यायचा या हेतूने त्यांची मिरवणूक काढून पाद्य पूजा केली. दिवसभर आम्ही फक्त आई- वडिलांची सेवा केली. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद प्रेम हे शब्दात न सांगण्याजोगे होते.’

litsbros

Comment here