मानवता हाच खरा धर्म असुन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देऊन त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत रहावे; डॉ श्रीराम परदेशी यांचे प्रतिपादन
केतूर (अभय माने) मानवता हाच खरा धर्म असुन मिळालेली संधी पदाचा उपयोग करून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कल्याणसाठी आपण कार्यरत रहावे असे मत भाजपाची माजी शहराध्यक्ष डॉक्टर श्रीराम परदेशी यांनी व्यक्त केले मानवधिकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार दिनेश मडके, नशा मुक्ती अभियानाच्या सोलापूर जिल्हा ब्रँड अँबेसडरपदी महेश वैद्य यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार भाजप मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमात लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यापुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना डॉक्टर श्रीराम परदेशी म्हणाले की सध्याच्या धकाधकीची युगामध्ये प्रत्येक जण पैशाचे मागे लागला आहे अशा परिस्थितीमध्ये समाजाच्या कल्याणासाठी काम करणारे लोक फार कमी झाले आहेत ही परिस्थिती समाजासाठी घातक खहे. समाजात आपसामध्ये प्रेम सुसंवाद जिव्हाळा कमी झाल्याने माणूसकीचा झरा कमी होत चालला आहे.
त्यामुळे समाज व्यवस्था टिकवण्यासाठी समाजकारण करण्यासाठीही युवा पिढीने पुढे येणे गरजेचे आहे यासाठी राष्ट्रभक्ती व समाजाविषयी कळवळा असणे गरजेचे आहे.भारत महासत्ता बनण्यासाठी सामाजिक चळवळी गतिमान करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी पुढाकार घेऊन कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास अखिल ब्राह्मण संघाचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते उद्योजक महेश दोशी बजरंग भिंगारे मागासवर्गीय शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किसन कांबळे गुरुजी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी भाऊसाहेब फुलारी
पत्रकार आशपाक भाई सय्यद नरेंद्रसिंह ठाकुर .सचिन जव्हेरी सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबळे आधी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे सोशल मीडिया अध्यक्ष नितीन कांबळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमात दिनेश मडके महेश वैद्य यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सूत्रसंचालन नरेंद्रसिंह ठाकुर यांनी केले तर अंगद देवकते यांनी मानले.
Comment here