आम्ही साहित्यिकमहाराष्ट्रराज्य

——– ड्रायव्हर… एक सारथी ———–

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

——– ड्रायव्हर… एक सारथी ———–

तसं पाहिलं तर एका ड्रायव्हरच्या घरात माझा जन्म झाला माझे वडील रेल्वेमध्ये इंजिन ड्रायव्हर होते कालांतराने काही तांत्रिक अडचणीमुळे आपरेटर वजा ड्युटी म्हणजे पाणी उपसण्यासाठी पंपावर ड्रायव्हर ची ड्युटी व माझे चिरंजीव एक ड्रायव्हर त्यामुळे एक वेगळी पार्श्वभूमी या लेखाला प्राप्त झाली आणि इथेच लेखाचा जन्म झाला
तर आपण जरा बारीक विचार करू कारण आता एका अशा कौशल्य धारकांविषयी पाहणार आहोत साधारण पन्नास शंभर लोकं हजारो किलोमीटर एकदम हायवेवरुन सुखरूप इच्छित स्थळी घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाचं जीवन आपण प्रदर्शित केलेलं आहे पहिल्यांदा नुसता ड्रायव्हर म्हणजे पेशानी ड्रायव्हर भले गाडी घरची किंवा मालकाची अथवा सरकारी असो जसा आपण आपल्या कपाटातील ड्रेस वापरून झाल्यावर व्यवस्थित हँगरला लावून ठेवतो धुतल्यानंतर त्याला छान पैकी इस्त्री वगैरे करतो वगैरे तसेच प्रवासा वरून आल्यावर योग्य ठिकाणी गाडी पार्किंग करणे नंतर कपडा मारणे वेळ असेल तेव्हा वॉशिंग करणं ओघानं आलंच कारण समाजामध्ये विविध प्रकारचे ड्रायव्हर आहेत उदाहरणार्थ… रिक्षा…कार… ट्रक… क्रेन… जे सी बी…पोकलेन…वालवो…लक्झरी… एसटी… ऍम्ब्युलन्स…ट्रॅक्टर…प्रत्येकाची एक वेगळी अशी शैली…त्यात सर्वात महत्त्वाचं सांगायचं ड्रायव्हर हा एक वर्ग समजू या वर्गातील बहुतांश लोक हे एवढे उच्च शिक्षित नसतात त्यातल्या त्यात ट्रॅक्टर किंवा ट्रक ड्रायव्हर तर बहुतेक कमी किंवा न शिकलेले पण असतात पण एक विशेष आहे त्यांच्या बोलण्यात सगळे शब्द हे इंग्रजीच असतात .

उदाहरणार्थ एखाद्या सराईतासारखं फाडफाड बोलतात स्टेरिंग…इंजिन… क्लच… ब्रेक… एक्सीलेटर…फ्रंट…बॅक… आयलिंग करायचं…इंजिन डाऊन करायचं… वॉशिंग… पंचर…पासिंग… टेस्ट… ड्रायव्हिंग…व्हील… किती तरी सांगू कारण धोका आहे हे माहीत असून पण कायम धोका खिशात घालून हिंडावं लागतयं आता ग्रामीण भागात ऊस तोडणी झाल्यावर ट्रॅक्टरला काही वेळा दोन किंवा तीन सुद्धा ट्रॉली लावतात त्या मुळातच ओवरलोड असतात पण ट्रॅक्टर सुखरूप पुढे गेला आहे पण मागची ट्रॉली पलटी झाल्यामुळे अपघात झालेलं आपण बघतोय खरंच हे लाइफ असं आहे यामध्ये कौटुंबिक सुख आणि जेवण हे वेळेवर कधीच मिळत नाही त्यातल्या त्यात मोठ्या स्टार हॉटेलमध्ये किंवा मॉलमध्ये पार्किंग मध्ये वालेट पार्किंग ड्रायव्हर विशेष करामती असतात कस्टमर गेटपर्यंत गाडी आणतात ती गाडी ड्रायव्हर पार्किंगला लावून कस्टमरला आपल्या वेळेला गाडी पार्किंग मधून काढून देऊन सरा च्या ऐवजी शेजारच्या मॅडमला नमस्कार घालतात मग मॅडम सरांना सांगते त्याला दोनशे चारशे रुपये टीप द्या ही आयडीया काही मुरलेल्या ड्रायव्हरला माहिती असते कस्टमर कडे पैसे नसतील तर G पे वर पेमेंट करायला सांगतात आणि समजा एखादं असतयं हेकेखोर टीप नाही दिली तरी सर सर म्हणणारी पण कित्येक जण पाहिलेत याची खरी आणि जास्त कमाई होते ती 31 डिसेंबरला कारण प्रत्येक कस्टमर अत्यंत खुषीत असतोय प्रत्येक जन आदराची वागणूक देतोय कारण गाडी बाहेर जाताना थँक्यू म्हणणारे पण भरपूर असतात आणि काही इतके हलकट स्वभावाचे असतात की काही ठिकाणी मॅडम कंपनीत जनरल मॅनेजर व ती पण ड्रायव्हर चार दोन तास पार्किंग मध्ये कार मध्ये थांबवायचा त्यानं गाणं ऐकू नये म्हणून ती टेप रेकॉर्ड काढून पर्स मध्ये घालून वर ऑफिसमध्ये निघून जायची.


काही ड्रायव्हर एवढी काळजीपूर्वक व सिन्सिअर असतात कुत्र्यासारख्या किंवा इतर मुक्या प्राण्याला साधा धक्का सुधा लागुन देत नाही तशीच काही नालायक अशी असतात कि माणसं पण उडवतात मी शिवाजीनगर येथे संचेती चौकात पाहिलयं एक ड्रायव्हर मर्सिडीज गाडी एक जखमी कुत्रं पहिलं त्या कुत्र्याला गाडीत घालून नायडू हॉस्पिटल मधील डॉग केअर हॉस्पिटलमध्ये स्वतःचे पैसे देऊन उपचार केल्यावर बॅंडेज सकट ते कुत्रं पुन्हा त्या स्पॉटवर आणून सोडलेलं मी पाहिलेलं आहे त्या ड्रायव्हरला सलाम आणि नंतर कळलं त्या ड्रायव्हरचं नाव संदीप व्हतं एवढंच समजलं आणि अजून एक दरवर्षी आषाढी वारीच्या वेळी आलेल्या वारकऱ्यांना जेवण फराळ इत्यादी उपयोगी वस्तू म्हणजे मेण कापड… छत्र्या…इत्यादी साहित्य देणारे जय महाराष्ट्र रिक्षा स्टँड संघटना… सौरभ हॉल… ताडीवाला रोड…पुणे…ही संघटना सर्व जणं रिक्षा ड्रायव्हर मी स्वतः पाहिलयं संघटनेतील सर्व रिक्षा ड्रायव्हर यांचा उत्स्फूर्त सहभाग असतोय खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे काही ड्रायव्हर कॉन्फिडन्स ने गाडी चालवतात तर काही ओव्हर कॉन्फिडन्स दाखवतात व आपण पाहिले कारण स्पीड लिमिट शंभरचा असतोयं आणि त्याची गाडी 140 ने चाललीय काय करणार आहे का नाही म्हणत्यात ना हातानी उद्योग…एखाद्या मालकाकडे कामाला असल्यावं मालक मोठा ऑफिसर आपले गप्प बसावं का नाही गाडी चालवताना उगाच आपलं लेफ्ट घे… राईट घे… घाल घाल… हे बदल… ते बदल… ड्रायव्हर असतोयं जरा सटकू अशा टायमाला गाडी चौकात सोडून जाणारे पण मी पाहिलेत आता याला काय आपलं गप असावं का नाही आता ह्याला काय गाडी चालवता येतीय व्हयं.


माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी भायखळ्याला जाताना कामशेत च्या पुढे वीस चाकी ट्रक ची एक स्टेपनी रोडच्या मधोमध पडलेली होती पहाटे साडेपाच वाजण्याची वेळ व्हती माझ्या गाडीचा स्पीड 140 होता एक्स्प्रेस हायवेवर तुरळक 7-8 लोकांची गर्दी दिसली आता काय करावं अचानक ब्रेक दाबावा तर अपघात ब्रेक मारावा तर मागची गाडी येऊन धडकायचा धोका काही वेळा लेन बदलावी तरी धोका अशा टायमाला थोडा कट मारला… तर गाडीवरच नियंत्रण हरवलं गाडी क्षणात उजवीकडे अन क्षणात डावीकडे झाली झटके देऊ लागली आणि वेगात पुढे जाऊ लागली असे जवळ जवळ एखादा किलोमीटर अंतर पार केले पण मागे मी व माझी सौं. होती क्षणात ती माझ्या अंगावर पडायची क्षणात मी तिच्या अंगावर पडायचो तिच्या हाताचा कोपरा माझ्या डोळ्याला जबर लागून डोळा चांगलाच सुजला होता मला तर काय चाललंय क्षणभर काहीच कळत नव्हतं फक्त माझी सौ स्वामी स्वामी असं ओरडत होती एक किलोमीटर पुढे गेल्यावर साधारण अर्धा तास गाडी साईडला घेऊन पार्क केली मनस्थिती स्थिर केली पुन्हा पुढच्या प्रवासाला लागलो मोठ्या संकटातून स्वामींनी वाचवले कारण स्वामी कायम आमच्या बरोबर असतात आणि विशेष म्हणजे सारथी माझा मुलगा धनंजय बेंद्रे होता खरं पाहायला गेलं तर अभिमन्यु चक्रव्युव्हात अडकला होता इथं तर यानी आम्हाला चक्रव्यूहातून बाहेर काढलयं काही ड्रायव्हरची स्पेशालिटी असतीयं काही फक्त रिक्षा कार ट्रक चालवतात पण काही माझ्या मुलासारखे ऑल राऊंडर असतात काही जगाच्या पाठीवरील सर्व प्रकारची वाहन चालवतात काही गाड्यांना तर स्टीअरिंग पण नसतयं फक्त डिजिटल स्क्रीन असतं बसल्या बसल्या हातातला माऊस सगळं काही काम करतोय आणि कुठेही न ऐकलेली परंतु मादक गाणी ही ट्रॅक्टरवर ऐकायला मिळतात कुठं मिळतात देव जाणे जसं गाडीत पेट्रोल डिझेल भरतात तसं एखाद्या ड्रायव्हरच्या नसानसात पेट्रोल-डिझेल भरलेलं असतं असं वाटतं की ती त्या गाडीशी एव्हढी एकरूप झालेली असतात
बरे एक वेळेस तर माझा मुलगा त्यावेळी एक्सप्रेस वे नव्हता कार्गो ची डिलिव्हरी व्हॅन थ्री व्हीलर टेम्पो रात्रीची ट्रॅफिक कमी असते म्हणून जुन्या पुणे मुंबई हायवे वरून ट्रीप वर निघाली खंडाळ्याच्या घाटात ठराविक स्पॉटला चोर दरोडेखोर लुटमारी साठी दबा धरून बसलेले असतात अन कंपनीने त्या टेम्पोला 60 च्या अंडर स्पीड ब्लॉक केलेलं असतयं तशा अवस्थेत मुंबईला सुखरूप पोचवले एकदा तर कर्नाटक बिदर मार्गे श्रीशैल्यम व तिरुपती सफर असा आराखडा होता.

हेही वाचा – ***…अस्तित्वाची चाहूल — डिंग डॉंग…***

निकाल मुलांचा की पालकांचा.? प्रत्येक विद्यार्थी व पालकांने वाचावा असा लेख

गाडीमध्ये चार पुरुष चार बाया व तीन मुलं अशी एवढी गाडीमध्ये होती एर्टिगा गाडी व्हती तेलंगणाच्या गर्द जंगलामधून गाडी चालली होती जी पी एस पण लावलेला होता पण अचानक पाय वाट लागली गाडी साधारण 60 च्या स्पीड मध्ये होती जरा संशय आला तशाही अवस्थेत रोडच्या खाली गाडी उतरवून बॅक घेऊन पुन्हा मेन रोडवर आणली व एकेठिकाणी मारुती मंदिराजवळ एका अनोळखी माणसाला रस्ता चुकलेला आहे असं सांगितलं तर तो म्हणाला तुम्ही कुठे आहात हे मी सांगणार नाही पण तुम्ही ताबडतोब तिथून निघाला तर फार बरे होईल कायम ड्रायव्हींग केल्यामुळे डोळ्यावर एक प्रकारे झोपीची तार होती जवळ जवळ तीस चाळीस किलोमीटर मेन रोड सोडून गाडी गेली होती एक पेट्रोल पंपावर परवानगी घेऊन थांबलो मोटारीत जरा आरामशीर पडलो सी सी टी व्ही कॅमेरा मध्ये पेट्रोल पंपाच्या मालकाने पाहिले ताबडतोब सांगितले हे ठिकाण खूप धोक्याचे आहे तुम्ही ताबडतोब मेन रोडला जा कारण काही अशा काही गैर कृत्य करणाऱ्या संस्था आपला जी पी एस हॅक करून त्यांचा जी पी एस ऑपरेट करतात व आपण त्यांच्या जाळ्यात अनायासे सापडले जातो पण अशावेळी ड्रायव्हरची कमालच म्हणावी लागेल नंतर गाडी श्रीशैलम चे दर्शन घेऊन तिरुपती च्या वाटेला लागली पण तिरुपतीच्या घाटातील पाऊस अक्षरशः ढगातून गाडी चालली असा आभास निर्माण व्हायचा जिवाचा नुसता थरार सर्वसाधारणपणे जाऊन येऊन साधारणपणे 1780 किलोमीटर एवढा प्रवास झाला ड्रायव्हरचे खरंच आभार मानावे लागेल व त्यांची आमच्यावर फार उपकार पण इथं तर माझा मुलगाच गाडीची ड्रायव्हिंग करत होता आणि जंगलात जंगली जनावरं वारंवार रस्त्यावर आडवी येतात व त्यांच्या जिवाला इजा पोचू नये म्हणून जागोजागी भरपूर स्पीड ब्रेकर लावलेले व्हते त्यांचा अजून जाण्यामध्ये अडथळा अजूनही काही ठिकाणी साधी रिक्षा बोलवायची असेल तर काही जणं ए रिक्षा… काही जणं ओ रिक्षा तर काही जणं ओ रिक्षावाले काका असा आवाज देतात शेवटी आपले गुण आपणच दाखवायचे असतात पुन्हा एकदा सांगावसं वाटतं ते सगळं जाऊ द्या पण जेव्हा जेव्हा रस्त्याने जात असेल व ॲम्बुलन्स ड्रायव्हर खरंच विटेवरचा जगाचा मालक पांडुरंग म्हणून गाडी चालवतोय मागं पेशंट घटका मोजत असतयं गाडी मध्ये बसलेले सगळे नातेवाईक एका वेगळ्याच टेन्शनमध्ये असतात त्यांचं सगळं लक्ष दुसरीकडं कुठं नाही तर ड्रायव्हर कडं असतयं अशावेळी आपण आपली गाडी तशीच रोडवर एका बाजूला ठेवून द्यायची व ट्रॅफिक जाम होत असेल तर होऊ द्या पण ट्रॅफिक जाम झाला काही बिघडत नाही पण अशावेळी खाली उतरून त्या ॲम्बुलन्स ला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्या ठीक आहे पोलिस असतात पण चौकात एक पोलिस काय काय करणार अशा वेळी आपण मदतीला धावून गेलं पाहिजे ते समाधान त्याच्यातलं…त्याच्यातच… तुम्हाला देव भेटेल काय उपवास करायची गरज नाहीये आणि कोणत्या देवळात पण जायची गरज नाही आपण आपला हा लेख घेऊन इथेच थोडं थांबू या
**************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here