करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

प्रत्येक विषयावर भूमिका मांडणारे आणि बातम्या देणारे पाटील गटाचे प्रवक्ते व पाटील गट मकाई कारखान्याच्या निवडणुकीबाबत गप्प का? तालुक्यात जनतेत जोरदार चर्चा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्रत्येक विषयावर भूमिका मांडणारे आणि बातम्या देणारे पाटील गटाचे प्रवक्ते व पाटील गट मकाई कारखान्याच्या निवडणुकीबाबत गप्प का? तालुक्यात जनतेत जोरदार चर्चा

करमाळा(प्रतिनिधी); सतत तालुक्यातील प्रत्येक घटनेवर भूमिका घेणारे पाटील गटाचे प्रवक्ते व सबंध पाटील गट तालुक्यातील सहकाराचे मंदिर व शेतकर्यांचा जिव्हाळायाचा विषय असणाऱ्या मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत गप्प का आहेत? हा विषय आता नागरिकांमध्ये सर्वात जास्त चर्चेत आहे.

याबाबत पाटील गट विरोधकांनी तर टिकेची झोड उठवली असून सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. एरव्ही आमदार संजयमामा शिंदे यांच्या कोणत्याही कामाबद्दल, निर्णयावर आणि राजकीय घडामोडींवर बारकाईने नजर ठेऊन असलेले हे प्रवक्ते लगेचच टिकेची झोड उठवतात.

एखादा विषय जर पाटील गटाच्या अंगलट येत असेल असे दिसून येताच मोठ्या हुशारीने तो विषय दुसरीकडे वळवतात. कधी कधी तर विषयाचा आशय बदलून पाटील गटाची राजकीय पोळी भाजून घेतात. मोठ्या चातुर्याने व रंजक भाषेत आपली वक्तव्ये देऊन प्रसार माध्यमांचे लक्ष सतत आपल्याकडे वळवण्यात दंग असलेले प्रवक्ते सुनील तळेकर हे मकाई कारखान्याच्या निवडणुकी बाबत आता मुग गिळून गप्प का आहेत? असा सवाल दबक्या आवाजात विरोधक करत आहेत.

कदाचित याबाबतीत बागल गटाशी काही बोलणी झाल्यानेच तळेकर यांनी आपली टिकेची तलवार म्यान करुन ठेवली असावी अशी शंका काही विरोधी गटातील महत्वाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

इतरवेळी तालुक्यातील प्रत्येक सहकारी संस्था, शासकीय विभाग, विकास कामे व प्रलंबित प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मत मांडणारे प्रवक्ते मकाई बाबत आपली माहिती का लपवत आहेत हा सुध्दा एक संशोधनाचा विषय आहे. गेल्या दोन वर्षांपासून दररोज वेगवेगळ्या बातम्यांनी स्वतःचा व पाटील गटाचा टिआरपी वाढवणारे व सतत लोकांच्या चर्चेत राहणारे प्रवक्ते मकाई सारख्या महत्वाच्या निवडणुबाबत बोलत नाहीत व विशेष म्हणजे या निवडणुकीत पाटील गटाची भुमिका काय आहे.

यावर अजिबात चर्चा करत नसल्याचे दिसून येत आहे. पाटील गटाचे प्रवक्ते हे केवळ आमदार संजयमामा शिंदे गटावरच टिका करत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले असून आता तळेकर यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

litsbros

Comment here