माढासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

भोसरे येथे माता रमाई यांची जयंती महिला मंडळाच्या वतीने साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भोसरे येथे माता रमाई यांची जयंती महिला मंडळाच्या वतीने साजरी

माढा प्रतिनिधि : माढा तालुक्यातील भोसरे येथील सम्राट अशोक नगर येथे माता रमाई यांची 125 वी जयंती महिला मंडळाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम ग्रामपंचायत सदस्य सुलन रामदास बागल यांनी समाजमंदिरास माता रमाई यांची प्रतिमा भेट दिली.त्या प्रतिमेचे उदघाटन समाजातील जेष्ठ महिला रुक्मिणी राजपूत , जनाबाई खरबडे, ताई अंकुशराव यांच्या हस्ते करण्यात आले.

त्या नंतर भोसरे चे प्रथम नागरिक सरपंच सौ.स्वाती नीलकंठ कुंभार यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक धम्म वंदना घेण्यात आली, व लहान मुले मुली यांनी रमाई वर आपले मनोगत मांडले, व ग्रामविकास आघाडी भोसरे यांच्या तर्फे गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला, कार्यक्रमाच प्रस्तावना रोहन झिंगळे यांनी केले व सूत्र संचालन भैय्या भालेराव व अमोल राजपूत यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरला सुनील राजपूत म्हणून होत्या.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील 104 गावांसाठी 94 कोटी 29 लाख निधी: जेऊरला 3 कोटी 11 लाख तर.. क्लिक करून वाचा इतर गावांची यादी

पुणे- सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात, 4 ठार तर 20 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुनीता वाघमारे, उषा खरबडे, छाया झिंगळे, पूजा जानराव, सुमन वाघमारे, रेखा भोसले, सुनंदा बाबर, बेबी भोसले, ज्योती जानराव, लक्ष्मी वाघमारे, उमा बोकेफोडे, स्वीटी वाघमारे, मीरा रजपूत,अरुना कदम, सरिता झिंगळे, सरोजिनी झिंगळे, अर्पिता राजपूत, रेखा बडेकर, सविता माने , सुवर्णा जानराव व समस्त महिला मंडळ उपस्थित होते.

litsbros

Comment here