केत्तूर विकास सोसायटीच्या चेअरमन पदी मिंड यांची निवड व्हा.चेअरमन पदी ठोंबरे
केत्तूर प्रतिनिधी – केत्तूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी मनोहर गोरख मिंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.व्हाईस चेअरमन पदी तानाजी अंबादास ठोंबरे यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी सभापती बापुसाहेब पाटील यांचे केत्तूर संस्थेवर गेली पंचवीस वर्षे पासून सत्ता असुन विद्यमान चेअरमन दिगंबर नाझरकर व व्हा चेअरमन भारत देवकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.या निवडी नंतर माजी सभापती बापुसाहेब पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह पाटील,
हेही वाचा – वाशिंबेतील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता;नामवंत किर्तनकांरानी बजावली सेवा
माजी चेअरमन दिगंबर नाझरकर,शंकर कानतोडे,बंडु पाटील,सचिन जरांडे,शहाजी पाटील,सरपंच सचिन वेळेकर,उपसरपंच भास्कर कोकणे,माजी सरपंच रामदास राऊत,हरी खाटमोडे,दादासाहेब पाटील,भिमराव येडे,लालासाहेब कोकणे,चंद्रशेखर कोकणे,सचिन खराडे,शंकर बागल,संपत मोरे-पाटील यांनी नुतन पदाधिकार्यांचां सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
Comment here