केतूर येथील कृष्णा शेतकरी गटाच्या वतीने सदस्यांना स्नेहभोजन व लाभांशाचे वाटप
केत्तूर प्रतिनिधी –
महाराष्ट्र शासन कृषी विभाग संचलित कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा)अंतर्गत नोंदणीकृत केत्तुर येथील कृष्णा शेतकरी गटाच्या १० वर्ष पूर्तीनिमित्त स्नेहभोजन व लाभांश वाटप करण्यात आले.
यावेळी कृष्णा शेतकरी गटाचे अध्यक्ष सचिन जरांडे(सर),सचिव वैभव काटकर, जेष्ठ संचालक दादासाहेब कानतोडे ,संतोष कानतोडे(भाऊसो),डॉ ननावरे, सचिन खराडे,किरण खाटमोडे, डॉ गुलमर, रेवणनाथ पवार,विजयसिंह बाबर,हरिश्चंद्र खाडे, सोमनाथ खाटमोडे,पप्पू देवकर यांचेसह अभिजित निकम,गणेश जरांडे,गणेश कोकणे,अमोल खाटमोडे, भगवान कदम ,कांतीलाल गुलमर हे संचालक उपस्थित होते.
हेही वाचा – चार फेब्रुवारीला होणार करमाळा येथे श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
कृषी पदवीधर युवक नागनाथची किमया; करमाळा तालुक्यातील केम मध्ये लाल चुटुक स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी!
महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड योजना,बांधापर्यंत खत पोहोच योजना यासह कित्येक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे उद्देश शेतकरी गटाचे असल्याचे कृषी सहाय्यक शिंदे साहेब यांनी सांगितले.
Comment here