करमाळाशेती - व्यापारशैक्षणिक

कृषी पदवीधर युवक नागनाथची किमया; करमाळा तालुक्यातील केम मध्ये लाल चुटुक स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कृषी पदवीधर युवक नागनाथची किमया; करमाळा तालुक्यातील केम मध्ये लाल चुटुक स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी!

केम (ओंकार जाधव); येथील कृषी पदवीधर नागनाथ हरिदास तळेकर यांनी आपल्या शेतात एक एकरावर स्ट्रॉबेरी फळांची लागवड केली आहे.

केम व परिसरातील प्रमुख द्राक्ष, डाळींब,केळी, पेरू, सीताफळ या सारख्या फळपिकांची लागवड झालेली आहे.

काही शेतकरी जिद्द व मेहनतीच्या जीवांवर उत्कृष्ट उत्पादन घेत असल्याचे आढळून येत आहे.

आशा परिस्थिती त कृषी पदवीधर झालेल्या नागनाथ तळेकर यानी आपल्या भागात नवीन काय तरी करायचे उद्देशाने त्यानी आपल्या शेता एक एकरावर स्ट्रॉबेरी ची लागवड केली याला कृषी सहायक चौधरी साहेब यानी या रोपाविषयी मार्गदर्शन केले नागनाथ तळेकर यांनी वाई येथून क्यिंटर डाउन या जातीची स्ट्रॉबेरी ची रोपे आणली.

या पिकांचे लागवडीतील अंतर चार बाय एवढे असून याला माध्यम स्वरूपाची जमीन आवश्यक असते तसेच लागवडी पूवीं खताचा बेसळ डोस वापरून त्यावर मल्चिंग ड्रीप अंथरले या पिकाला थंड हवामानाची गरज असून साधारणतः डिसेंबर महिन्यात याची तोडणी येइल या हिशेबाने याची लागवड केली जाते.

तसेच या पिकासाठी एकरी दिड लाख एवढा खर्च आला असून विद्राव्य खते तसेच काहि औषध फवारणी याचा खर्च मिळून जवळपास ५० हजार खर्च आला आहे.

तपमानात कमी करण्यासाठी स्तिप्र कंलरचा वापर तसेच प्लाटचा सर्व बाजूंनी जुन्या साडयां चा वापर करून कुंपण केले आहे या साठी कुशल कामगारांची आवश्यकता आहे सुशिक्षित बेकार युवकांनी नौकरी घ्या मागे न लागता स्ट्रॉबेरी ची लागवड करावी असे त्यांनी सांगितले.

litsbros

Comment here