केम येथील श्री ऊत्तरेश्वर देवस्थानच्या शिवलिंगास वज्रलेप करून पुर्नप्राणतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न
केम (प्रतिनिधी संजय जाधव);
करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थान च्या शिवलिंगास वजृलेप करण्यासाठी वीस दिवस मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते दि २५मे गुरूपुष्प मुहूर्तावर हे मंदिर खुले करण्यात आले
उत्तरेश्वर महाराजांच्या शिवलिंगास वज्रलेप करण्यासाठी मंदिर बंद करण्यात आले होते. आज विविध धार्मिक कार्यक्रम करून मंदिर खुले केले यामध्ये सकाळी गावातून जलदिंडी काढण्यात आली या दिंडीचे पूजन भैरू शिंदे व त्यांच्या पत्नी पुष्पा शिंदे यांच्या हस्ते करून दिंडीची सुरुवात श्री विठ्ठल मंदिरातून झाली यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी उत्तरेश्वर मंदिरात पोहोचले.
यावेळी गावातील हजारो महिलां दिंडीत सहभागी झाल्या होत्या दिंडी उत्तरेश्वर मंदिर येथे आल्यानंतर महिलांनी व पुरुषांनी फुगड्या खेळल्या यावेळी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले.
यामध्ये सकाळी श्री स लघुरूद्राभिषेक होम हवन धार्मिक कार्यक्रम उत्तरेश्वर देवस्थानचे चेअरमन व सर्व सदस्य यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला गावातील हजारो नागरिक उपस्थित होते आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा सर्वांनी लाभ घेतला विशेष म्हणजे गावातील सर्व आचारी बांधवांनी महाप्रसाद विनामूल्य केला.
करमाळा तालुक्यातील वंजारवाडीच्या लेकीची UPSC मध्ये बाजी; देशात 530 वा क्रमांक पटकावला
या बद्दल श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व ऊत्तरेश्वर रक्तदाते संघटनेचे वतीने त्यांचा सन्मान केला या वेळी श्री ऊत्तरेश्वर देवस्थान चे महंत जयंतगिरी महाराज ऊपस्थित होते.
सायंकाळी आठ ते साडे नऊ या वेळेत ह,भ,प,बोधले महाराज यांचे कीर्तन झाले या साठी भाविकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
Comment here