अखेर केम येथे हैदराबाद-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस व मुंबई-पंढरपूर या गाड्यांच्या थांब्याला मान्यता; गावात उत्साहाचं वातावरण
केम : (प्रतिनिधी श्री संजय जाधव ); रेल्वे परिपत्रक क्रमांक
COACHING NOTIFICATION No.
469/22……..date – 30/12/2022… अनुसार प्रायोगिक तत्त्वावर केम रेल्वे स्थानकावर दादर पंढरपूर गाडी क्रमांक 11027/11028
व मुंबई हैदराबाद गाडी नंबर 22731/22732 या दोन एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला आहे.
त्याचा शुभारंभ दिनांक 7 जानेवारी रोजी केम स्थानकावर पार पडला यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय रणजीत सिंह नाईक निंबाळकर… करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय संजय मामा शिंदे व माजी आमदार माननीय नारायण (आबा) पाटील…माजी आमदार माननीय जयवंतराव जगताप आदींनी हिरवा झेंडा दाखवून दोन्ही एक्सप्रेसचा शुभारंभ केला हा कार्यक्रम रेल्वे विभागाने केम स्थानकावर आयोजित केला होता.
सुरुवातीला रेल्वे विभागाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान यावेळी खासदार माननीय नाईक निंबाळकर म्हणाले की केम हे गाव कुंकवासाठी प्रसिद्ध आहे या गावात मोठी बाजारपेठ आहे या गावातील बहुसंख्य रेल्वेवर अवलंबून आहेत.
ते पुढे असेही म्हणाले की हैदराबाद मुंबई व चेन्नई मुंबई या गाड्या येथे थांबत होत्या परंतु रेल्वे विभागाने कोरोनाच्या काळामध्ये या गाड्यांचा थांबा रद्द केला.
हा थांबा रद्द केला यासाठी केम प्रवासी संघटना… व्यापारी असोसिएशन… प्रहार संघटना… यांनी रेल्वे विभागाकडे प्रयत्न केले केम ग्रामस्थांनी रेल्वे थांबण्याची मागणी केली त्यावेळी मी जनता दरबारातून सोलापूर रेल प्रबंधक व रेल्वे राज्यमंत्री माननीय रावसाहेब दानवे यांना फोन केला परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही रेल्वे विभागाने तांत्रिक अडचण दाखवली प्रसंगी मी माझ्या रेल्वे बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना फोन केला तसेच सर्व खासदारांनी माझ्या मतदारसंघातील रेल्वेची कामे करावीत अशी मागणी लावून धरली.
या मागणीचा विचार करून केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव यांनी केम स्टेशनला दादर पंढरपूर व मुंबई हैदराबाद या गाड्यांना थांबा दिल्याचे पत्र सोलापूर विभागाला दिले आणि याचा शुभारंभ माझ्या हस्ते झाला याचा मला आनंद होत आहे.
रेल्वे परिपत्रक
COACHING NOTIFICATION No.
382/2023…Date :09/6/2023… अनुसार
या वरील गाड्यांना कायमस्वरूपी चे अधिकृत थांब्याचे पत्र आले आहे. त्यामुळे केम ग्रामस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.
Comment here