श्रीदेवीचा माळ येथील सर्व्हिस रोड झाला नाहीतर होऊ शकतात अपघात; वेळीच सावध व्हा!
करमाळा (अभय माने) : अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग अकलूज सुनिता पाटील मॅडम या सोमवारी ( दि.19 जून ) रोजी करमाळा दौऱ्यावर येत असून कोर्टी ते सालसे या रस्त्याचे कामाची पाहणी करणार असून याबाबत काही कुणाचे प्रश्न तक्रारी असल्यास सोमवारी दुपारी एक वाजता अभियंता पाटील यांची बांधकाम खात्यात भेट घ्यावी.
खंडोबा माळ करमाळा ते देवीचा माळ पायथा या रस्त्याच्या दोन्ही बाजूने 15 फुटाचा डांबरी रोड फुटपाथ म्हणून करावा ही संपूर्ण कमलाभवानी भक्तांची मागणी आहे.
सद्गुरु काम अडवल्यानंतर या मागणीला ग्रुपचे मॅनेजर बनसोडे साहेब व ठेकेदार भरत अवताडे यांनी हे काम पूर्ण करण्याचे देवीच्या माळावरील ग्रामस्थांना आश्वासन दिले होते.
सर्विस रोड झाला नाही तर येणाऱ्या काळात मोठे मोठे अपघात होऊन अनेक कमलादेवी भक्तांना आपली प्राण गमवावे लागण्याची भीती आहे यामुळे या प्रश्नासंदर्भात पत्रकारांनी जागृत नागरिकांनी अधीक्षक अभियंता सुनीता पाटील यांच्याशी संपर्क करावा ही विनंती.
Comment here