करमाळा

“भैरवनाथाच्या नावानं चांगभलं” च्या गजरात केतूरच्या काळभैरवनाथांची यात्रा उत्साहात संपन्न 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

“भैरवनाथाच्या नावानं चांगभलं” च्या गजरात केतूरच्या काळभैरवनाथांची यात्रा उत्साहात संपन्न 

केत्तूर (अभय माने): केत्तूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त छबिना व भैरवनाच्या घोड्याची मिरवणूक मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडली.” भैरवनाथाच्या नावानं चांगभलं ” च्या जय घोषणा नागरिकांनी उस्फूर्तपणे मिरवणुकीत उत्साहात सहभाग घेतला होता.

    काळभैरवनाथ मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून छबीना मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी घोड्याला आकर्षक रोषनाई करण्यात आली होती फटाक्याची आतषबाजी व गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. सुमारे सहा तासांच्या मिरवणुकीनंतर पुन्हा भैरवनाथ मंदिरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी तरुणांचा उत्साह मोठा होता.संपूर्ण यात्रा व छबिना मिरवणूक कोणतेही गालबोट न लागता शांततेत संपन्न झाली यावेळी यात्रा कमिटीने परिश्रम घेतले.

  सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावेळी महिलां भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली.

litsbros

Comment here