आम्ही साहित्यिककरमाळा

ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय  लतीफ नल्लामंदू यांच्या जीवनावरील दोन पुस्तकांचे मंगळवारी सोलापुरात होणार प्रकाशन 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय

 लतीफ नल्लामंदू यांच्या

जीवनावरील

दोन पुस्तकांचे मंगळवारी सोलापुरात होणार प्रकाशन 

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघ , एस एस ए आर्टस कॉमर्स महाविद्यालय व इंडियन युथ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार स्व.लतीफ नल्लामंदू यांच्या कार्याचा आलेख असलेल्या 

” शम – ए – कासिद – ” संपादनडॉ . शफी चोबदार [ उर्दू ] “अ . लतीफ नल्लामंदू : व्यक्तित्व व कर्तृत्व ” संपादन प्राचार्य . इकबाल तांबोळी व प्राचार्य शकील शेख [ हिंदी – मराठी – इंग्रजी लेख संग्रह] अशा दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ दिनांक 10 ऑक्टोंबर मंगळवार रोजी सकाळी १०;३० वाजता “डॉ . एपीजे . अब्दुल कलाम सभागृह ” सोशल महाविद्यालय किडवाई चौक , सोलापूर येथे आयोजित करण्मात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री तथा सोलापूरचे सुपुत्र मा सुशिल कुमार शिंदे साहेब असतील , अ भा . मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा श्रीपाल सबनीस साहेब यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन तर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष मा . रविंद्र बेडकीहाळ , अभा उर्दू कॉन्फ्रसचे अध्यक्ष यु एन बेरीया , उद्योगपती दत्ता अण्णा सुरवसे , बिझनेस एक्प्रेसचे ए . आय मुजावर, खादिमाने उर्दू फोरमचे अध्यक्ष विकार शेख, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .

 

तसेच या वेळी सौ . शुभदा कुलकर्णी व रईसा मिर्जा या दो प्राध्यापिकांना ” आदर्श शिक्षक ” म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरवविण्यात येणार आहे .

तरी सर्व साहित्य प्रेमीनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहान प्रा. पी पी . कुलकर्णी , अय्यूब नल्लामंदू , प्राचार्य इ . जा तांबोळी , मजहर अल्लोळी यांनी केले आहे.

दिनांक 10 ऑक्टोबर रोजी होवू पाहणाऱ्या कार्यक्रमाला सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे

        

litsbros

Comment here