करमाळा

विविध मागण्यांसाठी सोलापूर येथे कामगारांचा विराट मोर्चा; ॲड.राहुल सावंत यांच्या नेतृत्वात करमाळा येथील अनेक कामगार सहभागी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

विविध मागण्यांसाठी सोलापूर येथे कामगारांचा विराट मोर्चा; ॲड.राहुल सावंत यांच्या नेतृत्वात करमाळा येथील अनेक कामगार सहभागी

 

करमाळा(प्रतिनिधी); महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी आपले उभे आयुष्य हमाल मापाडी कामगारांसाठी वेचले असून आज राज्यातील 36 महामंडळे स्थापन करण्यात डॉ. बाबा आढाव यांचा सिंहाचा वाटा आहे.

 महाराष्ट्रात सामाजिक सुरक्षितता कायदा डॉ. बाबा आढाव यांनी केंद्रात सहमत करून घेतला. परंतु सामाजिक सुरक्षितता कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही . यासाठी माथाडी बोर्ड जिवंत राहिले पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ यांनी केले. अशी माहिती हमाल पंचायत अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी दिली.

         महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाची संलग्न असणाऱ्या जिल्ह्यातील सर्व हमाल माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न निर्माण झाले असून ते प्रश्न जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी बोर्ड सोलापूरचे चेअरमन एस. एम. गायकवाड यांनी त्वरित सोडवण्यासाठी या जिल्हा मोर्चाचे आयोजन केले होते.

 या मोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. पुढे हा मोर्चा रामलाल चौक, भैय्या चौकात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दमाणी नगर मार्गे हा मोर्चा माथाडी बोर्डावर धडकला. या मोर्चामध्ये खालील मागण्यांचे निवेदन चेअरमन एस. एम. गायकवाड यांना देण्यात आले. 

         जिल्हात माथाडी हमाल कायद्याची अंमलबजावणी अनागोंदी व मनमानी कारभार तात्काळ थांबून कायद्याचे अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार या कायद्यातील शब्दप्रयोगाकडे आवर्जून लक्ष वेधावे, या कायद्याचे जिल्ह्यात सार्वत्रिक अंमलबजावणी झाली पाहिजे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये शासनाने जिल्हा माथाडी मंडळाकडे अधिकारी कर्मचारी यांच्या रिक्त जागा व नवीन नेमणूक केलेल्या नाहीत .

सबब माथाडी कायद्याची अंमलबजावणी करणारी सक्षम यंत्रणा कोलमडली असल्याने हमाल तोलाईदार माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही. कायद्याचे अंमलबजावणी होत नाही. जिल्हा माथाडी मंडळांमध्ये चार निरीक्षकांचे नेमणूक करण्यात यावी.  

 

जिल्हा माथाडी मंडळातील रिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन नेमणूक , भरती त्वरित करणे बाबत शासनाकडे मागणी करावी. जिल्हा माथाडी मंडळाकडे निरीक्षक व कर्मचारी यांचे नव्याने भरती करताना जिल्हा माथाडी मंडळाकडील नोंदणी कृत हमाल तोलाईदार महिला माथाडी कामगारांच्या मुला मुलींची प्राधान्याने भरती करणे सक्तीचे करावे व त्यांची भरती करावी.  

जिल्हा माथाडी मंडळ सक्षम होण्यासाठी स्थानिक माथाडी मंडळावर शासन नियुक्त हमाल व मालक प्रतिनिधी सदस्य यांच्या त्वरीत नियुक्ती कराव्यात. जिल्हा माथाडी मंडळावर कामगार हमाल प्रतिनिधींचे नियुक्त करताना खऱ्या हमाल संघटना प्रतिनिधी व खऱ्या कार्यरत हमालांच्या नियुक्त्या कराव्यात. 

वेळेवर पगार न भरणाऱ्या मालक, व्यापारी आडती यांच्यावर कायद्यानुसार खटले दाखल करण्याचे आदेश निरीक्षकांना द्यावेत. वैद्यकीय उपचार जिल्हा माथाडी मंडळा कडून मिळणेसाठी लेव्ही दरामध्ये किमान दरात वाढ करून लेव्हीचे दर 35 टक्के करावेत. हमाल – मापाडी कामगारांना म्हातारपणासाठी किमान तीन हजार रुपये दर मासिक पेन्शन तात्काळ सुरू करावी. 

जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली शासकीय धान्य गोदामातील हमालांना बाजार समिती प्रमाणे सक्तीची व हक्काची साप्ताहिक सुट्टी मिळावी . माथाडी बोर्डातून तीन महिन्यातून सोलापूर जिल्हा हमाल मापाडी समितीची चेअरमन बरोबर बैठक व्हावी, त्यामुळे जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल. 

सोलापूर बाजार समितीमध्ये कामगार काम करतात हे काही कामगार माथाडी बोर्डात नोंदीत नसल्यामुळे या कामगारांचा माथाडीत भरणा होत नाही. कामगारांची लेव्ही बुडून रोखीने पगार दिली जाते , त्यामुळे सर्व्हे करून बिगर नोंदीत कामगारांची माथाडीत नोंद करावी.

 जेणेकरून कामगारांना भरण्यासंदर्भात जनजागृती होईल व कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अशी माहिती ॲड. राहुल सावंत यांनी दिली.

         यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ , सरचिटणीस सुभाष लोमटे , जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे , हमाल पंचायत अध्यक्ष ॲड. राहुल सावंत , उपाध्यक्ष भीमा सीताफळे, सचिव संतोष सावंत, अध्यक्ष सुरेश बागल, गोरख जगताप, खजिनदार सुखदेव चव्हाण, संचालक वालचंद रोडगे, खजिनदार सिद्धाराम हिप्परगी, सचिव दत्ता मुरूमकर, संघटक शिवानंद पुजारी, ज्ञानदेव गोसावी, यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros

Comment here