करमाळा

वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा माढा विभाग बैठक करमाळा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा माढा विभाग बैठक करमाळा येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न

करमाळा (प्रतिनिधी आलिम शेख); 

 दि.6/10/2023 शुक्रवार रोजी वंचित बहुजन युवा आघाडी करमाळा तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. तालुका व शहर कमिटीवर इच्छुक असलेल्या कार्यकर्ते यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 

गांव तिथे जाऊन कार्यकर्ते जोडून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सर्वाना सोबत घेऊन पक्ष ताकद तयार करावी, सभासद नोंदणी करून घ्यावी. गावात जाऊन अडी अडचणी समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे, साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी आहे. 

 जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी आपले मत बैठकीत व्यक्त केले. आढावा बैठकीचे सूत्रसंचालन जय कांबळे यांनी केले. यावेळी शहर अध्यक्ष गणेश कांबळे,

महासचिव. राम कांबळे, कोषाध्यक्ष समाधान दनाने, सोनु मोरे, पप्पू उबाळे, महावीर शिंदे, कुमार मोरे, चिकू आल्हाट, शंकर शिंदे, लक्ष्मण वाघमोडे, किरण खरात, विकास उबाळे, तुषार लांडगे, गाडे, तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

एकंदर पाहता वंचित बहुजन युवा आघाडीची कार्यकर्त्याची बैठक मोठ्या उत्साहात व शांततेच्या वातावरणात आज करमाळा येथील शासकीय विश्रामगृह मध्ये मोठ्या दिमाखात पार पडली.

litsbros

Comment here